आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकासह टँकर विहिरीत:तिसर्‍या दिवशी ट्रॅक्टरसह मृतदेह काढला बाहेर; अकोल्यात 28 फूट खोल पाण्यात शोधमोहीम

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला तालुक्यातील माझोड येथे शेतातील विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेलेला टँकर विहिरीत कोसळल्याची घटना सोमवारी 6 जून रोजी घडली. आधी टँकर बाहेर काढल्यानंतर तब्बल पाच तासांची शोधमोहीम राबवून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 8 जूनला 28 फूट खोल विहीरीचा उपसा करून शेतमालकाने क्रेनच्या सहाय्याने विहीरीच्या तळाशी असलेला ट्रॅक्टर बाहेर काढला.

माझोड येथे एका शेतातील विहीरीतून पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅंकर चालक राजू मते यांच्यासह विहिरीत कोसळला होता. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस व पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या पथकाने मदतकार्य सुरू केले.

5 तासानंतर मृतदेह बाहेर

रात्री उशिरा टँकर विहिरीबाहेर काढण्यात आल्यानंतर एकूण 60 फूट खोल विहिरीतून 28 फुट पाणी पातळीचा उपसा करून ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. 28 फूट पाण्यात ट्रॅक्टरखाली दबलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढणे हे प्रचंड आव्हानात्मक कार्य असल्याचे दीपक सदाफळे यांनी सांगितले.

आव्हानात्मक शोधमोहीम

बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पथकातील सदस्य घटनास्थळी पोहोचले. तत्काळ शोधमोहीम सुरू केली. विहिरीच्या तळात असलेल्या ट्रॅक्टरवर अंदाजे 25 फूट पाणी होते. त्यात विहीरीच्या बाजू कच्च्या मुरुमाच्या असल्याने क्रेनच्या कंपनाने विहिरीचे फरमे कोसळण्याची भिती होती. चालकाचा मृतदेह ट्रॅक्टरखाली असण्याची शक्यता ग्रामस्थांना होती. अशावेळी पाण्यात मोठ्या धैर्याने ही आव्हानात्मक शोध मोहीम राबवली. अखेर रात्री दोनच्या सुमारास वायररोप व लोखडी रॅम्पच्या सहाय्याने बुडातील ट्रॅक्टर जागेवरच उलटवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...