आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Chance Of Pre monsoon Rains In The District Today, Cloudy Weather Throughout The Day; Comfortable Drop In Maximum minimum Temperature |marathi News

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, दिवसभर ढगाळ वातावरण; कमाल-किमान तापमानात दिलासादायक घट

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे वातारण तयार झाल्याने उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. गुरुवारी २६ मे रोजी अकोला जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड सांगतात. बुधवारी २५ मे रोजीही अकोल्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनची प्रतिक्षा सुरू असतानाच जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांना सुरूवात झाली आहे. अशात सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने कमाल आणि किमान तापमानात दिलासादायक घट झाली आहे. नैऋत्य राजस्थानवर १.५ किलोमीटरवर चक्राकार वारे वाहत आहेत. या कमी दाबक्षेत्रापासून अग्नेय अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे. झारखंडवर चक्राकार वारे वाहत आहेत. वातावरणातील या बदलामुळे अकोल्यासह पश्चिम आणि पूर्व विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. २६ मे रोजी अकोल्यासह अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर व यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २९ आणि ३० मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

तापमानात ४ अंशाने घट : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात दोन ते चार अंशांनी घट दिसून येत आहे. २० मे रोजी जिल्ह्यातील कमाल तापमान ४४.५ अंशावर होते. त्यानंतर सरासरी ४० ते ४१ अंश सेल्सिअस जिल्ह्याचे तापमान राहत आहे. परिणामी अकोलेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

फळबागांची घ्या काळजी : कृषी विद्यापीठाचे आवाहन
जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील वादळी वाऱ्यामुळे तेल्हारा तालुक्यात काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात वादळी वारे असल्याने फळबागा आणि लिंबू बागा धारकांनी काळजी घ्यावी. वादळवाऱ्यामुळे फळे असलेल्या झाडांना बांबूचा किंवा इतर उपलब्ध साधनांचा उपयोग करून आधार द्यावा. परिपक्व झालेल्या उन्हाळी पिकांची कापणी व मळणी करून माल तयार करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...