आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खानपान, दिनचर्या बदलू; मधुमेह, बीपीपासून स्वातंत्र्य मिळवू

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मधुमेह आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या अत्यंत चिंताजनक वेगात वाढत आहे. अगदी तिशीतील तरुणांमध्ये हे आजार झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाच आरोग्याच्या दृष्टीने या आजारांवर मात करून पुढे जावे लागणार आहे. यावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास येणाऱ्या काळात हे आजार देशात भयावह रूप धारण करू शकतात. त्यामुळे योग्य दिनचर्या, व्यायाम आणि सकस आहार या माध्यमातून मधुमेह आणि रक्तदाबाला रोखा, असे आवाहन डॉ. श्रेय अग्रवाल यांनी केले आहे.

कोविड संकटाच्या काळात आरोग्याचे महत्त्व अधिक प्रखरतेने पुढे आले. लोक खानपान आणि दिनचर्या पाळू लागले. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीनेही आणखी सजग रहावे लागणार आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर नोकरी, व्यवसायातील वाढती स्पर्धा यामुळे दिनचर्या पूर्णपणे बदलून गेली आहे. खानपानाच्या बदलत्या तऱ्हा, बदलत्या वेळा, व्यायामाचा अभाव यामुळे देशात मधुमेह आणि रक्तदाब हे दोन आजार झपाट्याने वाढत आहेत. कधीकाळी उच्च रक्तदाब हा फक्त वृद्ध लोकांना होणारा आजार समजला जात होता. मात्र अलिकडे अगदी २२ ते २५ वर्षांच्या तरुणांमध्येही तो आढळतो.

रुग्णवाढीचा आलेख चिंताजनक
वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, देशात २० ते ७९ या वयोगटात २०१९ पर्यंत तब्बल ७ कोटी ७७ लाख मधुमेहाचे रुग्ण आढळले आहेत. हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास २०३० मध्ये १० कोटींहून अधिक लोकांमध्ये मधुमेह राहू शकतो. २०४५ मध्ये हे संकट त्याहूनही भयंकर स्वरुप धारण करण्याचा धोका आहे. त्यामुळे वेळीच जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.

दिनचर्या पाळा, वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घ्या
रक्तदाब आणि मधुमेह यावर वेळीच नियंत्रण न आल्यास पुढील ७५ वर्षात हे आजार महामारीचे रूप धारण करू शकतात. सध्याचे देशातील वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे. त्यामुळे वेळीच जागृत होऊन योग्य दिनचर्या, सकस आहार, व्यायाम आदी बाबींकडे लक्ष द्यावे. ज्या रुग्णांचे उपचार सुरू आहेत. त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने नियमित उपचार सुरू ठेवावे. - डॉ. श्रेय अग्रवाल, हृदयरोगतज्ज्ञ.

बातम्या आणखी आहेत...