आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेसाठी फिल्डींग:शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल ; आता जिल्ह्याअंतर्गत बदलीची प्रक्रिया सुरू हाेणार

अकाेला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीनंतर जिल्ह्याअंतर्गत बदलीची प्रक्रिया सुरू हाेणार आहे. यासाठी वेळापत्रक तयार झाले असले तरी यात किरकाेळ बदल हाेणार आहे. मात्र शिक्षण विभागाने बदली प्रक्रियेसाठीची तयारी सुरू केली आहे. काही िशक्षकांकडूनही साेयीच्या शाळेसाठी फिल्डींग लावण्यात येत असल्याचे समजते.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गत दाेन वर्षे निर्बंध हाेते. परिणामी ग्रामविकास विभागाकडून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगिती दिली हाेती. मार्च २०२० पासून शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. अखेर शिक्षण विभागाकडून यंदा जिल्हा बदलीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली. दरम्यान जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेची चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये ग्रामविकास विभागातर्फे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन केल्या होत्या. या दरम्यान गोंधळ झाला होता. काही शिक्षकांची खोट्या कागदपत्राआधारे बदली केल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. त्यामुळे त्या शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी समन्वय समिती स्थापन करुन शिक्षकांनी आंदोलनही केले होते. काही शिक्षकांनी गुगल मॅपचा उपयोग करुन शाळांचे अंतर लांब दाखवून सोयीच्या ठिकाणी बदल्या करुन घेतल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...