आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वत्रिक निवडणुक:ग्रा.पं.मतमोजणीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी २० डिसेंबरला सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. त्यामुळे वर्धमान भवनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारी वाहतूक, सरकारी बगीच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारी वाहतूक,जि. प. चौकात वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवली. सरकारी बगीचा-जिल्हाधिकारी कार्यालय- शासकीय रूग्णालय- अशोक वाटिकेकडे जाणारी, येणारी वाहतूक सरकारी बगीचा- खोलेश्वर-चित्रा टॉकीज- रजपूतपुरा चौक- बागाची देवी मंदीर- कालंका माता मंदीर- न्यू राधाकिशन प्लॉट - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- अशोक वाटिकेकडे जाण्या, येण्यासाठी सुरु राहील.

शासकीय रूग्णालय- एचडीएफसी चौक- पं. स. कडे जाणारी, येणारी वाहतूक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-न्यू राधाकिशन प्लॉट- कालंका माता मंदीर- रवि स्कूटर समोरून - पं.स.कडे जाण्या- येण्यास सुरू राहील. सकाळी ७ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल राहील, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...