आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यायी मार्गाचा वापर करावा:श्रावण सोमवारनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण सोमवारनिमित्त प्रमुख मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून, चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.श्रावण महिन्यात जुने शहरातील राजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून पाणी आणून जलाभिषेक करण्याची जुनी परंपरा आहे. श्रावण महिन्यात रविवारी रात्री अकोला येथून शिवभक्त कावड, पालखी घेवून गांधीग्राम येथे जातात व सोमवारी सकाळी पूर्णा नदीचे पाणी आणून राजेश्वर मंदिरातील पिंडीला जलाभिषेक करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी अकोट मार्गावरील गांधीग्रामपर्यंत भक्तांची गर्दी असते. ही बाब लक्षात घेता ८ ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत अकोला-अकोट राज्य महामार्ग तसेच अकोला-दर्यापूर मार्गावरील वाहतूक व शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

असे आहे वाहतूक मार्गातील बदल
अकोला बस स्थानक : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चाैक (रेल्वे स्टेशन) - आपातापा चौक - गांधीग्राम मार्गे अकोटकडे जाणारी वाहतूक तसेच अकोट ते अकोला कडे याच मार्गाने येणारी वाहतूक पर्यायी मार्ग अकोला बस स्थानक - जेल चौक- निमवाडी खासगी बस स्टँड - वाशीम बायपास चौक- शेगाव टी पॉइंट- गायगाव -निंबा फाटा- अकोट. तसेच अकोट कडून अकोलाकडे येणारी वाहतूक याच मार्गाने वळवण्यात येत आहे.

अकोला बस स्थानक : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चाैक (रेल्वे स्टेशन) -आपातापा चौक- म्हैसांग- मार्गे दर्यापूरकडे तसेच दर्यापूर ते अकोलाकडे याच मार्गाने येणारी वाहतूक पर्यायी मार्ग अकोला बस स्थानक-टॉवर चौक-रेल्वे स्टेशन-टिळक पार्क मार्गे सातव चौक-न्यू तापडीया नगर-खरप टी पॉइंट-म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडून अकोलाकडे येणारी वाहतूक याच मार्गाने वळवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...