आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रींचे प्रवचन:रामदेवबाबा श्यामबाबा मंदिरात भक्तिगीतांचा जल्लोष; आचार्य श्यामदेव शास्त्रींचे प्रवचन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गीता नगर परिसरातील रामदेवबाबा श्यामबाबा मंदिरात सुरू असलेल्या आचार्य श्यामदेव शास्त्री यांच्या रामदेवबाबा कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राजस्थान येथील जुम्मा गायक विकी ब्यावत यांच्या संगीतमय उपस्थितीत सुरू असलेल्या या कथेत आचार्य श्यामदेव शास्त्री रामदेवबाबा यांची जीवनलिला आपल्या प्रवचनात प्रतिपादित करत आहेत.

आपल्या द्वितीय कथा सत्रात आचार्य शास्त्री यांनी तंवर वंशाची विस्तारपूर्वक गाथा साकार केली. या सत्रात आचार्यजी यांनी महाराजा रणसीजीची विहंगम कथा आपल्या संगीतमय वाणीतून प्रतिपादित केली. या वेळी जुम्मा गायक विकी ब्यावत यांनी भगवान रामदेवबाबा यांची सुरेख भजने सादर करून परिसरात जल्लोष निर्माण केला.

५ सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या अद्भुत कथेत गुरुवारी रामदेवबाबा जन्मोत्सव कथा व छप्पन भोग, पाळणा पूजन व महाआरती झाली. शुक्रवार, २ सप्टेंबरला माता मेणदे परचा, रूपदर्जी पर्चा एवं भैरव राक्षस वध की कथा आहे. ३ सप्टेंबरला लाखा बंजारा पर्चा, डालीबाई की जन्म कथा, बनिया बोयता को पर्चा, पिरो को पर्चा, नेतल दे का जन्माची कथा सांगतील. ४ सप्टेंबरला रामदेवजी विवाह उत्सव, हलदी, मेहंदी, बाजोट कथा होईल. सोमवार, ५ सप्टेंबरला सासू माँ पर्चा, भानुडा पर्चा, भाभी पर्चा, डालिबाई समाधी, हरबूजी पर्चा, डल्लासेठ जीवनदान आदी प्रसंग झाकी समेत साकार करत कथेची पूर्णाहुती होईल.

बातम्या आणखी आहेत...