आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभात किड्स स्कूल आणि अकोला महानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी निवड चाचणी प्रभात येथे दि. ८ व ९ एप्रिल रोजी पार पडली. या स्पर्धेत मुलामुलींच्या वयोगटासह ओपन आणि महिला गटातील १२० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते तर ४७ बुद्धिबळपटुंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. राज्यस्तरीय निवड स्पर्धेचे उद्घाटन प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते झाले. या वेळी महानगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष संदीप पुंडकर, सचिव जितेंद्र अग्रवाल, पंच प्रवीण ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
बुद्धिबळातून खेळाडूच्या व्यक्तिमत्वाचा पाया रोवला जात असून त्यांच्या बौद्धिक आणि आत्मिक विकास साध्य होत असल्याचे प्रतिपादन डॉ. गजानन नारे यांनी केले. यावेळी संचालक डॉ. गजानन नारे, डॉ. अमोल धोरण, डॉ. परातीकर यांच्यात झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीने स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या लढतींमध्ये ७,११,१५ व १९ वर्ष वयोगटातील ६० बुद्धिबळपटू सहभागी झाले. तर ९ एप्रिल २०२३ रोजी ९,१३,१७ वर्षा आतील तसेच खुला गट महिला गटातील जवळ जवळ ६० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. यातून उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या ४७ विजयी बुद्धिबळपटूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला रेड क्रॉस सोसायटीचे सचिव प्रभाजीतसिंग बछेर, ओम उद्द्योगचे संचालक पंकज राठी, प्रभातचे व्यवस्थापक अभिजीत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते तर प्राचार्य वृषाली वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचालन प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अकोला महानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी आणि प्रभातच्या क्रीडा विभागाचे संतोष लोमटे, आशिष बेलोकार, स्वप्नील मांदाळे, विशाल कोठळकर, राहुल वानखडे,रिया ताराम, सांस्कृतिक विभागाच्या संजीवनी अठराळे ,दिनेश आगाशे ,तांत्रिक विभागाचे श्रीकांत बुलबुले, सचिन मुरुमकार यांनी प्रयत्न केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.