आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:बालविवाह समाजाला लागलेली कीड‎; खंबाळे येथे झेडपी सीईओ भुवनेश्वरी एस यांचे मत‎

शिरपूर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालविवाहाला कोणत्याही‎ परिस्थितीत थारा देऊ नका. ती‎ समाजाला लागलेली कीड आहे.‎ ही कीड नष्ट करणे गरजेचे आहे.‎ बालविवाह होत असल्यास १०९८‎ या क्रमांकावर संपर्क साधा, असे‎ आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य‎ कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी‎ एस. यांनी केले.‎ येथील मुकेश पटेल चॅरिटेबल‎ ट्रस्ट, शिरपूर एज्युकेशन‎ सोसायटी व जिल्हा परिषदेतर्फे‎ शनिवारी तालुक्यातील खंबाळे‎ येथे बालविवाह प्रतिबंध‎ जनजागृती कार्यक्रम झाला. त्या‎ वेळी त्या बोलत होत्या.‎ ‎ शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या‎ विश्वस्त कृती भूपेश पटेल‎ अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी‎ अंजू पटेल, समाज कल्याण‎ सभापती कैलास पावरा, जिल्हा‎ परिषद सदस्य योगेश बादल,‎ खंबाळेच्या सरपंच सतीबाई‎ पावरा, पोलिस पाटील सुनील‎ पावरा, पंचायत समिती सदस्य‎ दिनेश पावरा, प्रितम पावरा,‎ शिवाजी पावरा, विनेश पावरा,‎ संजय कोळी, सुनील अग्रवाल,‎ रणजित पाटील, भावसिंग पावरा,‎ हिरालाल कोळी, संजय पावरा,‎ ग्रामसेवक आनंदा पावरा आदी‎ उपस्थित होते. सीईओ भुवनेश्वरी‎ एस म्हणाल्या की,‎ बालविवाहामुळे आरोग्यविषयक‎ अनेक समस्या निर्माण होतात.‎ बालविवाह करणे कायद्याने गुन्हा‎ आहे. या प्रकरणी कायद्यात‎ शिक्षेची तरतूद आहे. बालविवाह‎ रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे‎ यावे, असे आवाहन त्यांनी केले.‎ प्राचार्य आर. एन. पवार यांनी‎ प्रास्ताविक केले. सी. एन. पाटील‎ यांनी सूत्रसंचालन केले.‎

विद्यार्थिनींसोबत धरला ठेका‎
कार्यक्रमात आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी बेटी‎ हू मै बेटी हे गीत सादर केले. आदिवासी नारे‎ गीतावर नृत्य केले. विद्यार्थिनीं सोबत सीईओ‎ भुवनेश्वरी एस यांनीही ठेका धरला. जिल्हा महिला‎ व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, गटविकास‎ अधिकारी एस. टी. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...