आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हैसपूर येथे शिवमहापुराण कथा सुरु आहे. लाखो भाविक कथा ऐकायला येतात. कथेची वेळ सकाळची असल्याने आई-वडील आपल्या मुलांनाही आणतात. त्यामुळे एकीकडे सुव्यवस्थीत कपडे घालून पायी चालणारी चिमुकले तर दुसरीकडे फाटक्या-तुटक्या कपड्यात टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी काही चिमुकले दोन ते तीन किलोमीटरची पायपिट करतात.
कारण अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करणाऱ्या चिमुकल्यांसाठी शिवपुराण कथा म्हणजे आम्हा काय त्याचे? ठरली आहे. कथेला आई-वडीलांसोबत आलेले चिमुकले कथा झाल्यानंतर येताना कोणती ना कोणती खेळणी अथवा वस्तू हातात घेवून येताना दिसतात. कथे बाबत काहीही समजले नसले तरी आपल्याला खेळणी मिळाल्याचा आनंद या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत असतो.
गेल्या तीन दिवसांपासून हे चित्र पाहावयास मिळते. एकीकडे हातात खेळणी, खाण्याचे पदार्थ घेवून चालणारे चिमुकले दिसतात तर दुसरीकडे फाटलेले आणि मळलेले कपडे घालून फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करणारे चिमुकलेही दिसतात. संकलीत केलेल्या या बॉटल्समुळे किमान दोन पैसे तर मिळतील, या आशेने हे चिमुकले दोन ते तीन किलोमीटरची पायपिट करुन आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.
कारण शिवमहापुराण कथेतून माणसाला ज्ञान मिळत असले तरी या चिमुकल्यासाठी कथा म्हणजे ‘आम्हा काय त्याचे?’कारण या चिमुकल्यांना तर रोजच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.