आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला:संक्रमित रक्त दिल्याने चिमुकलीला एचआयव्ही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे दखल घेऊन चौकशीचे आदेश

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी आरोग्य यंत्रणेतील अक्षम्य चुकीमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील एका ८ महिन्यांच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवण्यात आल्याने एचआयव्हीची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. संबंधित डॉक्टर आणि खासगी रक्तपेढीने मात्र आपला दोष नसल्याचे म्हटले आहे.

हिरपूर येथील चिमुकलीला काही दिवसांपूर्वी मूर्तिजापूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत अवघाते यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रुग्णास रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगत अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्तपेढीतून रक्त आणण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रक्त दिल्यानंतर काही केल्या ताप कमी होत नव्हता. पेशी वाढत नव्हत्या. त्यामुळे या मुलीस अमरावतीच्या खासगी रुग्णालयात हलवले.

तेथील डॉक्टरांना एचआयव्हीचा संशय आल्याने तपासणी केली तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला. आई-वडिलांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली. यंत्रणेतील दोषामुळे निष्पाप मुलीला एचआयव्हीची बाधा झाल्याने न्याय मिळावा यासाठी चिमुकलीच्या पित्याने आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी तक्रारी केल्या. दरम्यान, रक्तपेढीतून मिळालेले रक्तच एचआयव्ही संक्रमित असल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...