आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पर्यावरण दिनी रविवारी चिमुकल्यांनी रॅली काढत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ही जनजागृती रॅली वृंदावन नगरात काढण्यात आली. आमच्या सुरक्षित भविष्यासाठी पर्यावरण रक्षणाचे कार्य करण्याचे आवाहन मुलांनी केले. मानवी हस्तक्षेपामुळे गत दहा वर्षांत जिल्ह्यातील वनक्षेत्रात सुमारे दोन ते तीन टक्क्यांनी घट होऊन अवघे सात टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. परिणामी येथील वन्यजीव आणि शेतीही धोक्यात येत आहे. दरम्यान ही बाब लक्षात घेऊन ५ जून रोजी पर्यावरण दिनी वृंदावन नगरातील सिद्धेश पालीवाल या १३ वर्षीय मुलाने त्याचे मित्र ,आई-वडील आणि वसुंधरा अर्थ केअर फाउंडेशनच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढली. रॅलीत ८ ते १३ वर्षे वयोगटातील मुले-मुली सहभागी झाल्या. यात सिद्धेश पालीवाल, हित जोगी, अनंत जोशी, कौस्तुभ पाटील,जय तिवारी, अद्वैता कांडेकर, सुमेध अनासने, स्वरूप खांडेकर, निशिता कळसकर, आरव आखरे, यज्ञेश इंगळे, तनुश्री दोनफळे आदींचा सामवेश होता. रॅलीसाठी नरेंद्र कळसकर, सौरभ तिवारी, अखिलेश जोशी, प्रवीण आखरे, पंकज काटे, हेमंत पिंपळखरे, शशिकांत देशमुख व मुकेश दोनफळे यांनी सहकार्य केले. डॉ. योगेश पालीवाल यांनी आभार मानले.
प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन
गतवर्षी पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. पाणी शिरण्याचे मुख्य कारण म्हणजे प्लॅस्टिक होते. प्लास्टिक पिशव्या, साहित्यामुळे नाल्या तुंबल्या होत्या. हे घाण पाणी रस्त्यावर व नंतर घरांमध्ये शिरले हेते. त्यामुळे प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन रॅलीतून करण्यात आले. पर्यावरण रक्षणाकरिता झाडे लावा व जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, आमचे भविष्य सुरक्षित करा, असेही आवाहन चिमुकल्यांनी केले. रॅलीत डॉ. मनीषा पालीवाल यांनी निःशुल्क कापडी पिशव्या वाटल्या. रॅलीत पुष्पा देशमुख, श्रावणी देशमुख, संगीता कांडेकर, माया डाबरे, नीतू आखरे व वृंदावन नगरवासी सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.