आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:जिल्ह्यात 18 ते 59 वयोगटातील नागरिक ‘बूस्टर डोस’च्या प्रतीक्षेत; घोषणा होऊन महिना झाला, पण एकही सशुल्क केंद्र नाही

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १८ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाने सशुल्क बूस्टर डोस जाहीर केला आहे. ही घोषणा होऊन एक महिना उलटला तरी जिल्ह्यात एकही खासगी लसीकरण केंद्र सशुल्क लसीकरणासाठी तयार झाले नाही.

दरम्यान दुसरीकडे शासकीय लसीकरण केंद्रावरून हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व साठ वर्षांवरील सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक यांनाच मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १८ ते ५९ वर्ष वयोगटातील अनेक पात्र लाभार्थी बूस्टर डोस घेण्यासाठी इच्छूक असून, त्यांनी बूस्टर डोस कुठे घ्यावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट सक्रीय असताना निवडक गटांसाठी बुस्टर अर्थात प्रिकॉशन डोस शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये ज्यांना सातत्याने कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कात किंवा समाजात वावरावे लागते असे, आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर तसेच सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अधिकची सुरक्षा मिळावी म्हणून प्रिकॉशन डोसच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती.

या वेळी १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस कधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान शासनाच्या घोषणेनुसार १० एप्रिलपासून या वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना सशुल्क बुस्टर डोस देण्याची मोहिम सुरू झाली. मोहिम सुरू होऊन एक महिना उलटला तरी अकोल्यात एकही खासगी केंद्र सशुल्क बुस्टर डोस देण्यास तयार झाले नाही, अशी माहिती मोहिमेतील वैद्यकीय अधिकारी देतात.

बातम्या आणखी आहेत...