आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदन; अल्पसंख्याकांविरोधात वातावरण दूषित करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पसंख्याकांवर अन्यायाचे प्रकरणे वारंवार सुरु आहेत. पैगंबर साहेबांबद्दल आक्षेपार्ह टिपणी केली जात आहे. या प्रकारामुळे देशाचे वातावरण दुषित होत आहे. ही बाब लक्षात घेवून अल्पसंख्याकांवर अन्याय करणारे तसेच देशाचे वातावरण दुषित करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते साजीदखान पठाण यांच्यासह अनेक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनातून केली. महंमद पैगंबरांवर केलेल्या टिपणीचा देशभरात विरोध करण्यात आला. त्याची निंदाही करण्यात आली.

मात्र टिपण्णी करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तसेच उत्तर प्रदेशात जेएनयुच्या विद्यार्थीनीच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला. तसेच पोलिसांच्या गोळीबारात १६ वर्षीय मुलगा ठार झाला. या सर्व बाबीमुळे देशाचे वातावरण दुषित होत आहे. त्यामुळे असा व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी साजीदखान पठाण, मो.जमिरभाई बर्तनवाले, मोईनखान, शेख हनिफ भाई, अयुब खान, मो.शारिकभाई, यासिन भाई, शेख अरशद, मो.साबीर, मो.इक्बाल, सय्यद जफर, शेख नवेद, इरफान कासमानी, मुजाहिदखान, मो.इक्बाल, शेख रेहान आदींनी निवेदनातून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...