आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Citizens Read The Complaints, Officials Are Speechless Development Plans Review Meeting; Encroachment, Waste, Unsanitary, Loose Animals Cause Problems

नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा, अधिकारी अवाक:विकास योजनांची बैठक; अतिक्रमण, कचरा, अस्वच्छता, मोकाट जनावरांचा त्रास

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील 20 वर्षात शहरात कोणत्या सोयीसुविधा हव्यात, कोणकोणत्या बाबींची गरज आहे, या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांकडून मांडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर तक्रारींचा पाढा वाचला. निमित्त होते महापालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 5 ऑगस्ट रोजी आयोजित महापालिकेच्या मुळ तसेच हद्दवाढ भागाच्या एकत्रित विकास योजनेच्या आढावा बैठकीचे.

शहराची विकास योजना तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने अकोला महापालिका आणि नगर रचना विकास योजना, विशेष घटक पवईचे उपसंचालक यांच्या विद्यमाने पुढील 20 वर्षांच्या कालावधीत शहरात नेमक्या कोणत्या सोयी सुविधा अपेक्षित आहे? नागरिकांना नेमके काय हवे आहे? याबाबी जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोटावर मोजण्या इतके ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या. मात्र विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

या बैठकीत नागरिकांकडून विकास योजनेबाबत सुचना अपेक्षित होत्या. तसे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. मात्र उपस्थित नागरिकांनी समस्या व तक्रारींचा पाढा या अधिकाऱ्यांसमोर वाचला. या बैठकीला नगर रचना विकास योजना विशेष घटक पवईचे विवेक मोरे, महादेव कुबल, प्रमोद दांदळे, हरीश खंडारे आदी उपस्थित होते.

या समस्या मांडल्या

कचरा घंटागाडी नियमित येत नाही. वाढीव पाणीपट्टी देयके वितरीत करण्यात आली. मोकाट जनावरांचा त्रास होतो. नियमित पाणी पुरवठा होत नाही. विविध भागात पाणी साचले आहे. महापालिका शाळांचा दर्जा घसरला आहे. पुतळ्या जवळचे अतिक्रमण काढण्यात यावे. हद्दवाढ भागात नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे. नियमित स्वच्छता करण्यात यावी. वृक्षारोपण करण्यात यावे आदी समस्या उपस्थितांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

शेतमालाला भाव नाही

आढावा बैठकीला उपस्थित एका युवतीने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, याबाबत तर एका महिलेने खासगी इंग्लिश शाळांना मान्यता देऊ नये, अशी मागणी केली. या तक्रारींचा पाढा आणि नागरिकांनी मांडलेल्या मागण्या ऐकुन उपस्थित अधिकारी अवाक् झाले.

या सुविधांची केली मागणी

विविध ठिकाणी पार्किंग, हॉकर्स झोन, शहर बस वाहतुकीसाठी स्थानके तसेच थांबे, हद्दवाढ भागात खेळण्यासाठी मैदाने, योग केंद्रासाठी आरक्षण, अभ्यासिका, स्टेडीयम.

पवईचे विवेक मोरे, महादेव कुबल, प्रमोद दांदळे, हरीश खंडारे.
पवईचे विवेक मोरे, महादेव कुबल, प्रमोद दांदळे, हरीश खंडारे.
बातम्या आणखी आहेत...