आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळसांड:तेल्हाऱ्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; प्रशासनाकडून दुर्लक्ष

तेल्हारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेल्हारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांकडून निवेदन सादर

लोकांच्या घरापर्यंत प्रतिदिन मुबलक पाणी पोहोचवण्याच्या हेतूने तेल्हारा नगर परिषद अंतर्गत वाढीव पूरक जलप्रदाय योजना भाजप-शेतकरी पॅनेलच्या सत्ताकाळात आणली. मात्र, सद्यःस्थितीत प्रशासनाने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे जलप्रदाय योजनेच्या कंत्राटदाराने केलेली कामे अपूर्ण स्थितीत असून निविदा प्रक्रियेनुसार असलेल्या करारनाम्यातून ४० टक्के कामे अपूर्ण सोडल्याबाबतचे निवेदन तेल्हारा न. प. मुख्यधिकारी, प्रशासक यांना भाजपतर्फे देण्यात आले. तेल्हारा शहर भाजपाध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या मार्गदर्शनात माजी नगरसेविका आरती गायकवाड, शहर सरचिटणीस गजानन गायकवाड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दिलेल्या पाणी पुरवठा योजनेबाबतच्या निवेदनातून इंदिरानगर, भागवत वाडी, योगेश्वर कॉलनी, केशव नगर, माहेश्वरी भोजनालय, उमेश पांडे निवास व तेल्हारा शहरातील विविध ठिकाणच्या गल्लीबोळीमध्ये अध्यापही पाइपलाइन पोहोचली नसल्याचा आरोप केला असून, दिलेले नळ कनेक्शन घरात जोडून देण्याची तरतूद निवेदन प्रक्रियेत आहे. मात्र नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतः पैसे देऊन नळ कनेक्शन जोडून घेतल्याचे नमूद केले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे कॉक दिलेच नाहीत. रोड क्रॉसिंगकरिता लोखंडी पाइप टाकले नाहीत. पाइप लाइन साडेतीन फूट न खोदता कुठे, १ तर २ फूट खोदली असून बहुतांश भागात पाणी पोहोचत नाही. कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत कामे केले नाही. इत्यादी बाबी निवेदनातून मुख्याधिकारी प्रशासक नगर परिषद तेल्हारा यांच्या निदर्शनास आणल्या आहेत. निवेदनात नमूद केलेल्या बाबी लक्षात घेऊन संबंधित कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारचे देयक देण्यात येऊ नये दिलेले सर्व कामे लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही न. प. शासनाची असून ती पूर्ण करावी.

देयक देण्यात आल्यास पूर्णत: आपण स्वतः जबाबदार राहणार असून यात न. प. प्रशासन, मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा संबंधित कर्मचारी जबाबदार राहतील असेच शेवटी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर माजी नगरसेवक मंगेश सोळंके, भाजयुमो शहराध्यक्ष गणेश इंगोले, रवी सोनोने, शे. रहेमान शे. शरीफ, सचिन बागलकर, शुभम चाफे, अशोक गव्हाळे, शिवा अमृतकार, एस. डी. बावणे, शिवहरी खेट्टे, समीर अली, नागोराव वानखडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...