आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज थकीत:शहर बस वाहतूक सेवा संस्थेकडे दोन कोटी 40 लाखांचे कर्ज थकीत ;वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून ठप्प असलेल्या शहर बस वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थेवर दोन कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. कर्ज हप्ते नियमित न भरल्या गेल्याने या रकमेत वाढ होत आहे. यावर तोडगा न काढल्यास शहर बस वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मनपाने शहराच्या विविध मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी शहर बस वाहतूक सेवा सुरु करण्याच्या हेतूने निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. यापैकी श्रीकृपा ट्रॅव्हल्स या कंपनीला बस वाहतूक सेवेचे कंत्राट दिले. संस्थेसोबतच्या करारनाम्यानुसार बसेस महापालिकेच्या नावाने खरेदी करण्यात आल्या. एकूण तिकीट विक्रीवर पाच टक्के रॉयल्टी महापालिकेला देण्याचा करार झाला होता. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शहर बस वाहतूक सेवा ठप्प आहे. कोरोना नंतरही ही बससेवा सुरु करण्याचा फारसा प्रयत्न झाला आहे. त्यात संस्थेने कोरोना काळात प्रशासनाला बसेस उपलब्ध करुन दिल्या. त्याचे भाडेही प्रशासनाने न दिल्याने बस वाहतूक सेवा सुरु करताना अडचणी येत आहे.ज्यावेळी बस वाहतूक सेवा सुरु केली. त्यावेळी एक कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज होते. दरमहा ४ लाख २३ हजार रुपयांचा कर्जाच्या हप्त्याचा भरणा संस्थेने करणे क्रमप्राप्त होते. संस्थेने ७० लाख रुपयांचा भरणाही केला. मात्र कोरोना पासून सेवा बंद झाल्याने कर्ज हप्ता थकला. आता ही रक्कम दोन कोटी ४० लाख रुपयांवर गेली आहे. त्यामुळे ३१ सिटरच्या १८ बसेस धुळखात उभ्या आहेत. या कर्जाबाबत तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या सोयीसाठी असलेली ही सेवा पूर्णत: ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक सेवा सुरु करताना अडचणी येत आहे.ज्यावेळी बस वाहतूक सेवा सुरु केली. त्यावेळी एक कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज होते. दरमहा ४ लाख २३ हजार रुपयांचा कर्जाच्या हप्त्याचा भरणा संस्थेने करणे क्रमप्राप्त होते. संस्थेने ७० लाख रुपयांचा भरणाही केला. मात्र कोरोना पासून सेवा बंद झाल्याने कर्ज हप्ता थकला. आता ही रक्कम दोन कोटी ४० लाख रुपयांवर गेली आहे. त्यामुळे ३१ सिटरच्या १८ बसेस धुळखात उभ्या आहेत. या कर्जाबाबत तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या सोयीसाठी असलेली ही सेवा पूर्णत: ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांना रिक्षाभाड्याचा भुर्दंड शहर बस वाहतूक सेवेत पाच रुपये ते पंधरा रुपये भाडे आकारले जात होते. त्यामुळे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास एका व्यक्तीला केवळ १५ रुपये खर्च येत होता. मात्र ऑटोरिक्षाने प्रवास करताना हा खर्च ४० ते ५० रुपये होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शहर बस वाहतूक सेवेतील उभ्या असलेल्या बस.

बातम्या आणखी आहेत...