आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी शहरातील व्यापाऱ्यास अटक

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न व औषध प्रशासनाने गोरक्षण परिसरातील पान विक्रीच्या दुकानावर छापा टाकून ११,४३८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त केला. याप्रकरणी दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. िजल्ह्यात अनेक िठकाणी प्रतिबंधित गुटखा, सुंगधी तंबाखुची िवक्री हाेत आहे. पाेलिसांकडून अनेकदा प्रतिबंधित गुटखा जप्तीची कारवाई हाेते.

मात्र अवैध गुटखा िवक्रीचे प्रकार बंद झालेले नाहीत. गौरक्षण रोड येथे सोमवारी छापा टाकून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. मे.ओमकार पान हाउस ॲण्ड डेली निड्स् (गौरक्षण रोड ) असे या दुकानाचे नाव असून, येथून ११,४३८ रुपयांचा सुंगधी तंबाखु (बाबा) व पान मसाला (रजनीगंधा) साठा विक्रीकरिता साठवलेला आढळला हाेता.

हा साठा जप्त करुन दुकान मालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी दुकानचालक करण दशरथ शितळेविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे कलमान्वयेे कलम गुन्हा दाखल केला असून, संशयितास पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई सहायक आयुक्त (अकाेला) नितीन नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, प्रभाकर काळे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...