आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • City Engineer Neela Vanjari In Charge Of Deputy Commissioner Transfer Of Other Employees For Smooth Functioning Of The Administration

उपायुक्ताचा प्रभार शहर अभियंता नीला वंजारी यांच्याकडे:प्रशासनाने कामकाज सुरळीत होण्यासाठी अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिर्घ रजेवर गेलेल्या उपायुक्त (प्रशासन) चा प्रभार आयुक्तांनी शहर अभियंता नीला वंजारी यांच्याकडे सोपवला आहे. त्याच बरोबर महापालिकेतील कामकाज सुरळीत चालावे, या हेतूने अन्य कर्मचाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत.

महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कर निर्धारण अधिकारी, मुख्य लेखा परिक्षक, लेखा परिक्षक आदी विविध विभागातील महत्वाची पदे रिक्त आहेत. जे वरिष्ठ अधिकारी महापालिकेत कार्यरत आहेत. ते अधिकारी अनेकदा दिर्घ रजेवर गेले आहेत. आत्ताही उपायुक्त (प्रशासन) जुम्मा प्यारेवाले हे दिर्घ रजेवर गेले आहेत. तर एकमेव सहाय्यक आयुक्त पुनम कळंबे देखिल दिर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे तुर्तास प्रशासनात शासनाचा अधिकारीच नाही. त्यामुळे कामकाज कोलमडले आहे.

अनेक फाईल्स पेडींग आहेत. ही बाब लक्षात घेवून आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी दिर्घ रजेवर गेलेल्या उपायुक्त (प्रशासन)चा प्रभार शहर अभियंता नीला वंजारी यांच्याकडे सोपविला आहे. मात्र अद्याप शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार अन्य कोणाकडेही दिलेला नाही. विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्यासाठी महापालिकेत वरिष्ठ अधिकारी देखील नाही. त्यामुळे महापालिकेचे कामकाज एकट्या आयुक्त सांभाळीत आहेत.

दरम्यान उपायुक्तपदाचा प्रभार शहर अभियंता यांच्याकडे दिल्या असताना शिक्षण विभागाचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी निवडणुक विभागातील कैलास ठाकूर यांची बदली शिक्षण विभागात लिपिक पदावर करण्यात आली आहे. याच बरोबर अन्य विभागातही कर्मचाऱ्यांंच्या बदल्यांची फाईल आयुक्तांकडे असल्याची माहिती आहे.

झोन अधिकाऱ्याचा प्रभार मनपा कर्मचाऱ्यांकडे

महापालिकेत सहाय्यक आयुक्तांची चार पदे मंजुर आहे. मात्र तुर्तास एक सहाय्यक आयुक्त महापालिकेत आहेत. त्याही दिर्घ रजेवर गेल्या आहेत. एकाच वेळी चार सहाय्यक आयुक्त महापालिकेला कधीही मिळालेले नाही. नियमानुसार सहाय्यक आयुक्त हे झोन अधिकारी असतात. झोन अधिकारीपदासह त्यांच्याकडे अन्य कामे सोपवली जातात. मात्र, एकाच वेळी चार सहाय्यक आयुक्त नियुक्त नसल्याने महापालिका प्रशासनाने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन अधिकारीपदी महापालिकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

काही कर्मचाऱ्यांकडे झोन अधिकारी आणि अन्य विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. झोन अधिकारी म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने ते दबावाखाली काम करतात.

बातम्या आणखी आहेत...