आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलेकरांना दिलासा:शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्वपदावर; महान येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा 10 तासानंतर सुरळीत

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तब्बल 10 तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. परिणामी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्वपदावर आला असून, वीजपुरवठा खंडीत झाल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलावा लागला होता.

लावले एक्स्प्रेस फिडर

अकोला पाणीपुरवठा योजनेचे अकोला येथून 32 किलो मिटर अंतरावर महान येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी 65 एमएलडी आणि 25 एमएलडी क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. 65 एमएलडी केंद्रातून 900 मिमी तर 25 एमएलडी केंद्रातून 600 मिमी व्यासाच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा होतो. जलशुद्धीकरण केंद्रातील पंप 24 तास सुरू असतात. त्यामुळेच पाणीपुरवठ्यात खंड पडू नये, यासाठी या ठिकाणी एक्स्प्रेस फिडरही लावण्यात आले आहे.

वीजपुरवठा सुरू

मात्र, 10 सप्टेंबर रोजी रात्री शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील वीज रात्रीच खंडीत झाली होती. मात्र खंडीत झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला. परंतु 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पुन्हा वीज पुरवठा खंडीत झाला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मेजर फॉल्ट असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागेल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलावा लागला होता.

केंद्रातील पंप सुरू

दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज दुरुस्तीचे काम सुरू केले. वीज दुरुस्तीच्या कामाला तब्बल 10 तास लागले. सकाळी साडेसहा वाजता खंडीत झालेला 11 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सुरळीत झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्या नंतर जलशुद्धीकरण केंद्रातील पंप सुरू करण्यात आले. वीजपुरवठा 10 तास खंडीत झाल्याने ज्या भागाला रविवारी पाणीपुरवठा होणार होत्या. त्या भागाला सोमवारी पाणीपुरवठा होणार असून ज्या भागाला सोमवारी पाणी पुरवठा होणार होता, तसेच आता मंगळवारी पाणीपुरवठा होणार आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल पाणीपुरवठा विभागाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...