आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य जप्तीला विरोध:व्यावसायिक आणि महापालिका पथकात झटापट, धक्काबुक्की

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमण हटाव माेहिमेदरम्यान शनिवारी महापालिका पथक व व्यावसायिकांमध्ये झटापट अन धक्काबुक्कीही झाली. गांधी राेडवर अतिक्रमितांचे साहित्य पथकाकडून जप्त करीत असताना हा विराेध झाला. मात्र अतिक्रमितांची दादागिरी माेडून काढत पथकाने काही साहित्य जप्त केले तर काही साहित्याची जेसीबीने नासधूस केली. पथकाच्या कारवाईला काही व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र नंतर परिस्थिती निवळली. तीन तासानंतर मात्र अतिक्रमणाबाबत स्थिती जैसे थेच पाहायला िमळाली.

शहरातील मदनलाल धिंग्रा चाैक ते महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली) आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते फतेहअली चाैक या दरम्यान सर्वाधिक रस्त्यावर िकंवा कडेला दुकाने थाटण्यात येतात. परिणामी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. त्यामुळे काही दिवसांपासून मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान शनिवारी १० डिसेंबरला सकाळी मनपाने गांधी रोडपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला प्रारंभ केला.

बातम्या आणखी आहेत...