आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुधलम ग्रामपंचायत येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. गावांमधील परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला. यामध्ये गावात घाण साचलेल्या नाल्या, तुंबलेले डबके यांना सुद्धा स्वच्छ करण्यात आले. गावात वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छता अभियान राबवून गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, विद्यार्थी, आदर्श व्यक्तींचा सत्कार सोहळा करण्यात आला. गावातून स्वच्छतेची प्रभात फेरी, दुपारी महाप्रसाद सायंकाळी महा कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला माहूर गड येथील आदर्शवान महाराज यांचे भारतामध्ये समाजसेवेचे कार्य सुरू आहे. शेतकरी, सैनिक, विद्यार्थी यांच्या हितासाठी कार्यरत संत बाळगीर महाराज यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यांच्या मार्गदर्शनाखालीच दुधलम येथे ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये गावातील सर्व जाती-धर्मातील पंथातील लोक एकत्र येऊन गाव आदर्शतेचा संदेश देत गावामध्ये स्वच्छता अभियान राबवले . यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला संत बाळगीर महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व तुम्हीच तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहात प्रत्येक विद्यार्थ्याने संघर्ष हा केलाच पाहिजे, मोबाईल टीव्ही यापासून विद्यार्थ्यांनी अलिप्त राहावे.
यासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व चांगला आदर्शवान विद्यार्थी घडवण्यासाठी त्यांच्या मातापित्यांना संत बाळगीर महाराज यांनी शपथ दिली. या वेळी प्रमुख व मुख्य आयोजक उपसरपंच शंकर महल्ले होते. यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदर्श कार्यक्रम झाला. या वेळी या कार्यक्रमाला संत बाळगीर महाराज, सरपंच प्रज्ञा पंडित, उपसरपंच शंकर महल्ले, ग्रामसेवक सुनिल अवधुत, ज्ञानेश्वर महल्ले, पोलिस पाटील नंदकिशोर महल्ले, ग्रामपंचायत सदस्य मायावती पंडित, प्रभा दाभाडे, विजया महल्ले, ऋषिकेश महल्ले, रंजना पंडित, जि. प. प्राथमिक शाळा मुख्याध्यापक बिडकर, लाईनमन दयाराम चव्हाण समारोप कार्यक्रमाच्या मंचवरती उपस्थित होते.
कार्यक्रमाकरीता शुभम महल्ले, महेश वानखडे, नंदू महल्ले, अजय महल्ले, गजानन महल्ले, विलास महल्ले, स्नेहदीप वानखडे, दिनकर पापळकर, किसन महल्ले, नारायण महल्ले, रामचंद्र वानखडे, रामदास ठोकळ, बापूराव पंडित, मुरलीधर वानखडे, संकेत महल्ले, अभी वानखडे, निर्मला म्हल्ले, बळवंत महल्ले, अंबादास महल्ले, गावातील दत्त मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जि. प. प्राथमिक शाळा विद्यार्थी व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.