आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्वच्छता अभियान:गाव रेडवा येथे स्वच्छता अभियान‎

बार्शीटाकळी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी तालुक्यातील गाव रेडवा येथे‎ पंतप्रधान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून‎ बार्शीटाकळी प. समितीचे उपसभापती संगीता‎ जाधव यांच्या नेतृत्वात गांवात शाळा, ग्राम पंचायत‎ इतर विविध ठिकाणी स्वच्छता अभियान व‎ स्वच्छतेसंबंधी साहित्य वाटप करून सेवा‎ पंधरवडा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात‎ आले.

‎ खा. संजय धोत्रे, अकोला भाजप जिल्हा‎ अध्यक्ष रणधीर सावरकर आणि आमदार हरिष‎ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात बार्शीटाकळी‎ तालुक्यातील गाव रेडवा येथे गाव स्वच्छता‎ पंधरवडा अंतर्गत बार्शीटाकळी प. समिती‎ उपसभापती व भाजपा विमुक्त भटक्या जाती‎ महिला अकोला जिल्हा अध्यक्ष संगीता जाधव‎ यांच्या नेतृत्वात शाळकरी मुलांना कचराकुंडी इतर‎ साहित्याचे वाटप करण्यात आले.‎

यावेळी शाळा परिसरात स्वच्छता अभियान‎ शाळकरी मुलांमार्फत राबवण्यात आले. गाव‎ रेडवा ग्राम पंचायत कार्यालय येथे उपसभापती‎ संगीता जाधव यांनी भेट घेऊन सरपंच सुजाता‎ राठोड, ग्राम विकास अधिकारी सरदार आणि ग्राम‎ पंचायत सदस्य यांची भेट घेऊन ग्राम पंचायत‎ रेडवा कार्यालयात विकास काम इतर लेखाजोखा‎ कार्याची पाहणी केली. ग्राम स्वच्छता पंधरवडा‎ अभियान राबवण्यासाठी उपसभापती संगीता‎ जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...