आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहिम:विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत नव्या उड्डाणपुलावर स्वच्छता अभियान

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिमे मध्ये शहरातील नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य विभाग स्वच्छता विभागाव्दारे दैनंदिन केल्या जाणाऱ्या स्वच्छते सोबतच विशेष स्वच्छता मोहिम राबवून शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे.

या अनुषंगानेच उड्डाणपुलाची स्वच्छता करण्यात आली. उड्डाणपुलावरील कचरा संकलित करण्यात आला. तसेच नागरिकांनी रस्त्याने अथवा पुलावरून जाताना कोणत्याही प्रकारची वस्तू, कागद, प्लास्टिक पिशव्या पाण्याच्या बाटल्या फेकून न देता, त्या कचरा घंटा गाडीत टाकून ‘स्वच्छ अकोला-सुंदर अकोला’ राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता विभागाने केले आहे. दरम्यान, या उड्डाणपुला बरोबरच अन्य पुलांवरही स्वच्छता मोहिम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

बातम्या आणखी आहेत...