आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई ठरतेय फार्स:शहरात गांधी चौक ते अकोट फैल पोलिस स्टेशन मार्गावरील अतिक्रमणाचा सफाया

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने सोमवारी २१ नाेव्हेंबरला शहरातील गांधी चौक -शहर कोतवाली-टिळक मार्ग ते अकोट फैल पोलिस ठाणे या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.या मार्गात रहदारीसाठी अडथळा ठरलेले अतिक्रमण हटवण्यात आले. ही मोहीम नियमितपणे शहरातील मुख्य मार्गावर राबवण्यात येणार आहे.

दरम्यान अतिक्रमण धारकांनी केलेले अतिक्रमण स्वत: काढावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शहरातील अतिक्रमणाबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खासगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात. तसेच, गर्दीच्या मार्गांवर असलेल्या अतिक्रमित हॉकर्स व दुकानांमुळेही रहदारीत अडथळे निर्माण होतात. विशेषत: शहरातील मुख्य मार्गावर हे चित्र सातत्याने अनुभवास येते.

आजही राबवणार मोहीम
मंगळवारी ओपन थिएटर ते माल धक्‍का, गांधी चौक ते ताजना पेठ पोलिस चौकी ते फतेह चौक या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...