आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोलेस्टाईल आंदोलन:शेत जमीन खरेदीचा चुकीचा फेरफार केल्याचा आरोप करत मोबाईल टॉवरवर चढला आंदोलक

अकोला6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने सांगळुद येथील शेतीखरेदीचा चुकीच्या पद्धतीने फेरफार घेतल्याचा आरोप करत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी प्रहारच्या महानगर उपाध्यक्षांनी मोबाईल टॉवर चढून आंदोलन सुरू केले आहे. अकोला शहरातील अकोट फैल भागात हे आंदोलन सुरू आहे. गोविंद गिरी असे आंदोलकाचे नाव आहे.

आंदोलनदरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. अकोट फैल पोलिसांनी आंदोलनाची माहिती मिळतात तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांना बाजूला केले.

नेमकी काय आहे मागणी?

अकोला तालुक्यातील सांगळुद येथील गट नं. २१९ येथे बबन डोंगरे यांच्या मालकीच शेत असून त्यांच्या शेतीची खरेदी काही दिवसांपूर्वी झाली. दरम्यान, ही खरेदी रद्द करण्यात यावी, यासाठी डोंगरे यांनी न्यायालय आणि उपविभागीय कार्यालयात धाव घेतली. न्यायालयात अन् उपविभागीय यांच्या दालनात खटला सुरू असतानाही मंडळ अधिकाऱ्याने व तलाठी यांनी चूकीच्या पध्दतीने फेरफार घेतल्याचा आरोप डोंगरे यांनी केला. याबाबत डोंगरे यांनी सांगितले, अशा कारभारामुळे मानसिक त्रास झाला. अशाप्रकारे पदाचा दुरुपयोग करून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेतीचा फेरफार घेतला असून या दोघांवरही तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. नायब तहसीलदार किंवा तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...