आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रात:योगायोग नवदुर्गा महोत्सवाच्या मंडपाचे भूमिपूजन ; विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत ४३ वर्षांपासून पश्चिम विदर्भातील रामदास पेठ परिसरातील योगायोग नवदुर्गा मातेचा महोत्सव यंदा नवरात्रात मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रात जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवणाऱ्या योगायोग नवदुर्गा महोत्सवात सामाजिक उपक्रमही या माध्यमातून राबवण्यात येत असतात. याही वेळेस असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

उत्सवा दरम्यान नित्य तीन क्विंटल प्रसादाचे भाविकांना वितरण करण्यात येत असते. दरराेज सकाळ व संध्याकाळ वाद्य गजरात होणारी देवीची आरती हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण असते. मंगळवारी स्थानिय रामदास पेठ येथील महोत्सवाच्या प्रांगणात ज्येष्ठ मंडप व्यावसायिक नानासाहेब उजवणे यांनी सपत्नीक कुदळ चालवून रितसर मंडपाचे भूमीपूजन केले. या वेळी मदन देशपांडे, राजू चिंचोळकर, विनीत आसरकर, विवेक आसरकर, मामा जोशी, निकुंभ, उंटवाले, प्रतीक तायडे, गणेश ददगाळ, संतोष आढाऊ, उमेश बिजवाडे, किशोर सवडतकर, योगेश राऊत, प्रवीण सामुद्रे, विजय बाळापुरे, बबलू भुईभार, उपाध्याय, अनिल खराटे, भारुका, संजय पुरी, गजानन चवले, दीपक अग्रवाल, आकाश उजवणे, रामेश्वर काळे, रुपेश उजवणे, मनोज लोहकपुरे, नितीन कदम समवेत परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...