आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात थंडी; किमान तापमान 15.9 अंशावर, थंडीत आणखी वाढ हाेणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दविसांपासून जिल्ह्यातून गायब झालेली थंडी परतण्यास सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्यात दविशी रवविारी, १ जानेवारीला किमान तापमानात घसरण झालेली पाहायला मिळाली. १५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जिल्ह्यात डिसेंबर २०२२ मध्ये महिन्यात वातावरणात वारंवार वातावरणात बदल झालेला पाहायला मिळाला. प्रारंभी थंडी सुरू झाल्यानंतर पुन्हा ती गायब झाली होती. सततचे ढगाळ वातावरण, पाऊस, उकाडा मध्येच थंडीचा जोर अशी काहीसी स्थिती गेल्या राहिली. १४ डिसेंबरला पावसाचे वातावरण होते. तत्पूर्वी १० डिसेंबरला सर्वात कमी १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. १९ ते २२ डिसेंबरदरम्यानही १४ ते १६ अंशावर पारा होता.

मालदीव परिसरात वाहणारे चक्राकार वारे, परिणामी विदर्भात अरबी समुद्रातून काही प्रमाणात येणारे बाष्प युक्त कोमट वारे यामुळे २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती, ती आता परतत आहे. पहिल्याच दविशी तापमान घसरून १५.९ अंशावर आले आहे. ही घसरण पुढील काही दविशी कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश व दिल्ली येथे थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी विदर्भातही तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

२ ते ३ अंशाने होणार घसरण प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र, नागपूर यांच्या कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार ३ जानेवारीपर्यंत वातावरण कोरडे राहील. नंतर पुढील दोन दविसात २ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात घसरण शक्य आहे आणि त्यानंतर फारसा बदल न होण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...