आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:शासकीय कार्यालये, शाळा, बसस्टँडवर सामूहिक राष्ट्रगीत गायनाने जागवली चेतना

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, मध्यवर्ती बसस्टँडसह विविध चाैक व अन्य ठिकाणी समूह राष्ट्रगीत गायनात नागरिक सहभागी झाले. एका सुरातील राष्ट्रगानामुळे वातावरण देशभक्तीमय झाले.

समूह राष्ट्रगान उपक्रम राबवण्यासाठी शासनाने परिपत्रक जारी करून सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार १७ आॅगस्टला सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात झाली. सकाळी ११ ते ११ वाजून एक मिनिट या वेळेत राष्ट्रगीत गायन झाले.नियाेजन भवनात राष्ट्रगान : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवन येथे समूह राष्ट्रगीताचा उपक्रम पार पडला. यात अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी रोजगार बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, तहसीलदार सुनील अरखराव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक मीरा पागोरे तसेच विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील अरखराव यांनी केले, तर आभार जया भारती यांनी मानले.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे मुख्य चौकांमध्ये वाहतूक पाेलिसांनी नागरिकांना साेबत घेत समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाचे आयाेजन केले. यात मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानकासमाेर), सिव्हिल लाईन्ससह अन्य ठिकाणांचा समावेश हाेता.मनपातर्फे समूह राष्ट्रगान : सकाळी ११ वाजता मनपा मुख्‍य कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय, अग्निशमन कार्यालय तसेच मनपाच्‍या सर्व शाळांमध्‍ये सामुहिकरित्‍या राष्‍ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला. मनपा मुख्य कार्यालयात शहर अभियंता नीला वंजारी, कार्यकारी अभियंता अजय गुजर, एच. जी. ताठे, सहायक आयुक्‍त अतिक्रमण जगदीश देशमुख, क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, देविदास निकाळजे, नगर सचिव अमोल डोईफोडे, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, जितेंद्र तिवारी, गजानन मुर्तडकर, श्याम राऊत, चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, मुकुंद घाटगे, संतोष नायडू तसेच मनपाचे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...