आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अपात्र:जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आदेश, ग्रामपंचायत सदस्येला तीन अपत्य

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाडेगाव येथील एका ग्रामपंचायत सदस्येला अपात्र घाेषित करण्यात आले आहे. संबंधित सदस्येला तीन अपत्य असून, अपात्रतेचा आदेश िजल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. काँग्रेसचे िजल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचाेळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली हाेती. यात त्यांनी गैरअर्जदार म्हणून ग्रामपंचायत सदस्या खैरुन्नीसा शेख चांद, नगर परिषदेचे जन्म व मृत्यू िवभागाचे निबंधक व ग्राम िवकास अधिकाऱ्यांचा समावेश हाेता. खैरुन्नीसा शेख चांद यांना तीन अपत्य असून, त्यांना अपात्र घाेषित करावे, अशी मागणी चिंचाेळकर यांनी अर्जात केली हाेती. २०२०-२१मध्ये ग्राम पंचायतची निवडणूक झाली हाेती. उमेदवारी अर्ज भरताना दाेन अपत्य असल्याचे खैरुन्नीसा शेख चांद यांचे म्हणणे हाेते. याप्रकरणात जन्म-मृत्य िवभाग आणि ग्रामपंचायतकडूनही अहवाल सादर करण्यात आला. उपराेक्त प्रकरणातील अर्ज, दस्तावेज, जबाब, जन्मप्रमाणपत्र, अहवालांचे अवलाेकन करण्यात आले. खैरुन्नीसा शेख चांद यांना तीन अपत्य असल्याचे िदसून येत आहे, असे िजल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...