आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपा आयुक्त कविता द्विवेदी रजेवर:प्रभारी आयुक्तपदाचा कारभार जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे सोपविला

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी शुक्रवार 16 डिसेंबर पासून एक महिन्याच्या प्रशिक्षण रजेवर गेल्या आहेत. या दरम्यान आयुक्त तथा प्रशासक पदाचा प्रभार जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पाच दिवसाच्या रजे नंतर सोमवारी दि.12 डिसेंबर रोजी रुजु झाल्या. मात्र त्या पुन्हा 16 डिसेंबर पासून एक महिन्याच्या प्रशिक्षण रजेवर गेल्या आहेत. या दरम्यान आयुक्त तथा प्रशासक पदाचा प्रभार कोणत्या अधिकाऱ्याकडे दिला जाणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. कारण महापालिकेत तुर्तास आयुक्त वगळता अन्य प्रशासकीय अधिकारी नाही. त्यामुळे आयुक्तांच्या खाद्यांवरच महापालिकेचे कामकाज सुरु आहे. आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी एक महिन्याच्या प्रशिक्षण रजेवर जात असल्याने या दिर्घ काळात आयुक्तपद रिक्त ठेवता येत नाहीत.

तर दुसरीकडे जिल्हाधिकारी नीमा अरोरा 18 डिसेंबर पर्यंत रजेवर असल्याने जिल्हाधिकारी पदाचा प्रभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे होता.त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभार कुणाकडे द्यावा याबाबत चर्चा सुरु होती. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त असल्याने कामकाज चालवण्यासाठी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीला वंजारी यांच्याकडे उपायुक्तपदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

त्यामुळे प्रभारी उपायुक्त नीला वंजारी यांच्याकडेच आयुक्त तथा प्रशासक पदाचा प्रभार देण्याबाबत चर्चा सुरु होती. परंतु आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रभार कोणाकडे सोपवायचा? याबाबत मार्गदर्शन मागीतले. नगर विकास विभागाने आयुक्त तथा प्रशासक पदाचा प्रभार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेला गती येणार

जिल्हाधिकारी नीमा अरोरा सोमवारी रुजु होत आहेत. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या सुचनेवरुनच शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नीमा अरोरा आयुक्तपदी असताना त्यांनी धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली होती. आता त्यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभार आहे. त्यामुळे अतिक्रमण मोहिमेला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच बरोबर जुना धान्य बाजाराच्या जागेबाबतचा निर्णयही जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्त म्हणून घ्यावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...