आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून संघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवल्या प्रकरणी आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, दिलीप बोचे व योगेश गीते यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर जुने शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हे दाखल केले. पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आमदार नितीन देशमुख यांनी श्री राज राजेश्वर मंदिरासमोर जिल्ह्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण तसेच महानगरपालिका अंतर्गत पाणी आरक्षणावरची स्थगिती उठवण्याकरता पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खारपानपट्ट्यातील नागरिक जे पाणी पितात तेच पाणी ते पाजण्यासाठी व आंघोळ घालण्यासाठी टँकरद्वारे नेऊन पिण्याच्या पाण्याची संघर्ष यात्रा काढली. सकाळी ९ वाजता पोलीस हजर असतांना आमदार नितीन देशमुख व त्यांचे १०० ते १२५ कार्यकर्ते परवानगी न घेता खारे पाणी संघर्ष यात्रेसाठी सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.