आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘दिवसेंदिवस कमी होत चाललेले वनक्षेत्र. त्यात वनांमध्ये वाढलेला मानवी हस्तक्षेप, पार्ट्या जंगलचराई, वृक्षतोड, वनवे आदींमुळे वने आणि तेथील जैवविविधता धोक्यात येत आहेत. वने ही केवळ मौज मजा करण्याचे क्षेत्र नाही तर शुद्ध पाणी, शुद्ध हवा आणि निसर्ग शिक्षण देण्यासाठी वने मोलाची आहेत. त्यामुळे वनांमधील प्रदूषण टाळून वनांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे,’ असे आवाहन आंतरराष्ट्रीय वन दिनाानिमित्त वन्यजीव आणि पक्षीअभ्यासकांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा, पातूर आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अभयारण्याचा काही भाग लागून आहे. पावसाळा तसेच उन्हाळ्यात अनेक लोक वनांमध्ये पर्यटनाला जातात. मात्र दिवसेंदिवस वनांमध्ये प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कागदांचा कचरा वाढत आहे. वनांमध्ये मौजमजा करायला जाणाऱ्यांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. परिणामी वनांमधील जैवविविधतेला अडथळा येतो. याशिवाय वनपरिक्षेत्रातील गावांमधून वनांमध्ये होणारी जनावरांची चराई, वृक्षतोड, रस्त्यांच्या कामामुळे होणारी वृक्षतोड, अतिक्रमण आदी अनेक संकटे वनांपुढे उभी आहेत, असे स्थानिक अभ्यासकांकडून सांगण्यात येते.
जिल्ह्यातील वनांमध्ये बेहडा, धावडा, मोह, तेंदूपान, खैर, सळई, यासह शंभरहून अधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत या शिवाय, हरीण, लांडगा, बिबट, तरस, रानडुक्कर, नीलगाय, ससा, जंगली मांजर, माकड या वन्यजीवांसह गवताळ आणि पाणथळ पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे बघायला मिळतात. -
हे करणे आवश्यक
प्लास्टिक जैवविविधतेला करू शकते बाधित
प्लास्टिक पिशवी जंगलात पडली तरी तेथील जैवविविधतेला बाधित करू शकते. त्यामुळे वने सांभाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्ह्यालगत पातूर, काटेपूर्णा, मेळघाट ही महत्त्वाचे जंगले आहेत. अशा भागात पर्यटनाला जाताना स्वच्छता ठेवली गेली पाहिजे. अमोल सावंत, वन्यजीव अभ्यासक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.