आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मरठी विशेष:आ. वसंत खंडेलवाल यांचे मत, योजनेची घेतली आढावा बैठक

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेमुळे विकासाची कामे पटापट मार्गी लागणार आहेत. यातून विविध समस्याही सुटणार आहे. त्यामुळे नगर सेवकांवरील ताण कमी होईल, असे प्रतिपादन आमदार वसंत खंडेलवाल यांनी केले.

केंद्र पुरस्कृत अमृत-२.० योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार या योजनेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार हरीश पिंपळे, सर्वच नगर परिषदांचे मुख्याधिकारी, मूर्तिजापूर नगराध्यक्ष कमलाकर गावंडे, बार्शीटाकळी नगरसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमृत २.० योजनेचे प्रमुख उद्दिष्ट सर्व नागरी संस्थांना म्हणजे महापालिका, नगरपालिकांना, घरोघरी नळाचे पाणी पोहाेचवणे, शहरांमध्ये मल नि:सारण करणे, शहरातील मोकळ्या जागेत हरित उद्यान प्रकल्प राबवणे अशा जनतेच्या मूलभूत सुविधांचा अंतर्भाव आहे. हे सर्व प्रश्न या योजने अंतर्गत सुटतील. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या सर्वच नगरसेवकांना याचा लाभ होणार आहे.

नवीन शासन निर्णयानुसार सुधारित प्रस्ताव व नवीन प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवायचा आहे. जेणे करून त्या नुसार जनतेला या योजनेचा फायदा चांगल्या प्रकारे होईल, असे आमदार खंडेलवाल यांनी सांगितले. या वेळी त्यांनी योजनेबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेत प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवण्याबाबतच्या सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...