आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Akola
 • Commencement Of 11th Admission; Admit List Announced, Admission In Total Three RoundsCommencement Of 11th Admission; Admission List Announced, Admission In Total Three Rounds

अखेर मुहूर्त लागला!:अकरावी प्रवेशाला सुरुवात; प्रवेश याद्या जाहीर, एकूण तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश

अकोला6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेश प्रक्रियांचे वेळापत्रक जाहीर केले असून, पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. सध्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश घेण्यात येत आहेत. यासाठी 27 जुलै अंतिम तारीख आहे. 28 जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. दिलेल्या नियमांनुसार प्रत्येक महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश जिल्हाशिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिले.

सीबीएसईसाठी पुढे प्रक्रीया

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली असून, त्याअधीन राहूनच प्रवेश होणार आहेत. सीबीएसई व आयसीएसई साठीही जागा रिक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढे या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशाबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षण विभागात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी संघटना सक्रीय

मागील चार वर्षापासून अकोला शहरामध्ये केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश घेण्यात येत होते. मात्र, यंदा ही पद्धती रद्द करण्यात आली. याचा विद्यार्थी संघटनांकडून विरोध होत आहे. यासाठी विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. तरी उपयोग झाला नाही. त्यामुळे संघटनांकडून प्रत्येक महाविद्यालयात त्यांच्या प्रतिनिधीद्वारे प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रवेश पारदर्शक पद्धतीने व्हावेत असा संघटनांचा आग्रह आहे.

पुढील वेळापत्रक याप्रमाणे

 • 26 ते 27 जुलै प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
 • 28 जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी लावणे.
 • 29 जुलै रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादी प्रमाणे प्रवेश देणे.
 • 30 जुलैला तिसरी प्रतीक्षा यादी लावणे.
 • 1 ऑगस्ट तिसऱ्या प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश देणे.
बातम्या आणखी आहेत...