आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:अकाेला शहरामध्ये महापालिकेच्या क्षेत्रातील वृक्षगणनेच्या कामास प्रारंभ

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रातील वृक्षगणना कंत्राटदारा मार्फत महापालिकेने सुरु केली आहे. या गणनेत नागरिकांच्या निवासस्थानातील वृक्षाची देखिल गणना केली जाणार आहे.महापालिका अस्तित्वात येवून २२ वर्ष होत आली. या दरम्यान महापालिकेत सर्वच पक्षांनी सत्ता हस्तगत केली. मात्र कोणत्याही सत्ताधारी गटाने वृक्षगणना केली नाही. मात्र कायद्याने वृक्षगणना करणे बंधनकारक करण्यात आल्या नंतर महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. राज्यात वृक्ष संवर्धनासाठी सन १९७५ मध्ये कायदा करण्यात आला होता.

या कायद्यानुसार वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. विशेषतः महानगरपालिका हद्दीतील वृक्षांबाबतचे अधिकार हे मनपातर्फे नियुक्त समितीला दिले आहेत. मात्र, अकोला मनपाची स्थापना सन २००१ मध्ये झाल्यापासून शहरातील वृक्षगणनाच झाली नाही.

त्यामुळे शहरात किती वृक्ष आहेत, किती वर्षे जुने वृक्ष आहेत, किती वृक्ष २० वर्षांच्या काळात तोडण्यात आली आणि किती नवीन वृक्ष लावून ती जगविण्यात आली याबाबतचा कोणताही डेटा महानगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता. महाराष्ट्र राज्य वृक्ष अधिनियम १९७५ नुसार हा सर्व डेटा महानगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध हवा. मात्र, गेले अनेक वर्षांपासून वृक्षप्रेमींतर्फे मागणीकरूनही शहरातील वृक्षगणना झाली नाही. आता कायद्याचा बडगा उगारल्यानंतर महापालिकेने वृक्ष गणना सुरु केली आहे.

१२५ चौरस किलोमीटरमधील वृक्षगणना : अकोला महानगरपालिकेची मूळ हद्द ही २४ चौरस किलोमीटर होते. सन २०१६ मध्ये महानगरपालिकेची हद्द वाढ झाली. मनपाच्या हद्दीला लागून असलेल्या २४ गावांचा अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. त्यामुळे मनपाचे क्षेत्रफळ आता १२५ चौरस किलोमिटर झाले आहे. या परिघातील सर्व वृक्षांची गणना केली जाणार आहे.

अशी सुरु आहे वृक्षगणना? : महानगरपालिका हद्दीतील वृक्षांची प्रत्यक्ष मोजणी सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक वृक्षाला नंबर दिले जाणार आहे. हे नंबर ऑईलपेंटने पाच ते सहा मि.मि. जाडीचे व ५० बाय ६० मि.मि.च्या प्लेटवर टाकले जातील. या नंबरनुसार प्रत्येक वृक्षाची माहिती ही संगणकीकृत केली जात आहे. त्याचा डेटा तयार करणे व त्याचे मेटन्स करण्याची जबाबदारी ही नियुक्त कंत्राटदाराची राहणार आहे. याशिवाय वृक्षगणनेचे संकेत स्थळ करून त्यावरही माहिती दिली जाईल. या संकेत स्थळाच्या देखलभालीची जबाबदारीही कंत्राटदाराचीच आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम: महापालिकेने वृक्षगणना करण्याच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त केला असल्याची माहिती नागरिकांना नाही. तसे महापालिकेने जाहिरही केले नाही. त्यामुळे वृक्ष गणनेसाठी आलेले कर्मचारी हे खरोखरच वृक्षगणनेसाठी आले आहेत का? अशी विचारणा नागरिक करीत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...