आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप््यातील पाणी पुरवठा योजनेच्या ७३८.४८ कोटींच्या प्रस्तावाला मजिप्राने तांत्रिक मंजुरी दिल्या नंतर मंत्रालयात या प्रस्तावाबाबत अमृत योजनेच्या समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे मंगळवारी १४ मार्चला होणाऱ्या या बैठकीत योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे. दुसऱ्या टप्प्यात १२ जलकुंभ, दोन जलशुद्धीकरण केंद्रासह विविध कामे केली जाणार आहेत. अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्या मुळ हद्दीत (२८ चौरस किमी क्षेत्रात) आठ जलकुंभ, जुन्या व क्षतीग्रस्त जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या, ज्या भागात जलवाहिन्या नाहीत, त्या भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या. जलशुद्धिकरण केंद्रातील विविध दुरस्त्या तसेच पाच पंप घेण्यात आले. यासह विविध कामे करण्यात आली.
ही कामे अंतिम टप्प्यात असताना अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात बहुतांश कामे ही हद्दवाढ झाल्यानंतर समाविष्ट झालेल्या २१ गावांमध्ये केली जाणार आहेत. यात जलवाहिनी टाकणे, जलकुंभ बांधणे, जलशुद्धिकरण केंद्र उभारणे, स्कॉडा ऑटोमेशन यंत्रणा राबवणे आदी विविध कामे केली जाणार आहेत.
अशी होतील कामे
हद्दवाढ तसेच मुळहद्दीत १३ जलकुंभाचे बांधकाम हद्दवाढ भागात ५०० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार अमानतपूर ताकोडा परिसरात ६० एमएलडी तसेच दगडपारवा प्रकल्पा जवळ १२.५० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र वान व दगड पारवा प्रकल्पातील पाणी ग्रॅव्हिटीने आणले जाणार हद्दवाढ भागात ग्रीन झोन जलशुद्धिकरण केंद्र परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प स्कॉडा ऑटोमेशनची कामे महान ते अकोला अशी ३२ किलो मीटरची जलवाहिनी बदलणार
वान प्रकल्पामधील स्थगिती कायम
महापालिकेला वान प्रकल्पात २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र या आरक्षणाला विरोध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये निवडणुकीपूर्वी स्थगिती दिली होती. ही स्थगिती अद्याप उठवलेली नसताना वान प्रकल्पात पाणी आरक्षण मिळेल, असे गृहित धरुन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, हे विशेष.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.