आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Compassionate Recruitment Has Been Stopped For 13 Years, People's Representatives Are Also Desperate, Many Beneficiaries Have Passed Their Age.

13 वर्षापासून अनुकंपा भरती रखडलेलीच:लोकप्रतिनिधीही हतबल, अनेक लाभार्थ्यांचे वय निघून गेले

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील गेल्या तेरा वर्षापासून महापालिकेत अनुकंपा भरती रखडली आहे. अनेकदा आंदोलने करुनही नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान दोन वर्षापूर्वी या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र यात तत्कालीन प्रशासनाने खोडा घातला. परिणामी अनुकंपावरील कर्मचारी अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

महापालिकेत कर्तव्यावर असताना मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून ही भरती प्रक्रिया विविध कारणांनी रखडली होती. महापालिकेतील अनेक नगरसेवक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रयत्नशिल होते. तर अनुकंपा उमेदवारांनी अनेकदा निवेदने, धरणे आंदोलन, उपोषण करुन या गंभीर मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महापालिकेचा आस्थापना खर्च ही प्रमुख अडचण या नियुक्तीत अडचण झाली होती.

याबाबत अनेक तत्कालीन आयुक्तांनी देखील शासनाकडे सातत्याने प्रस्ताव पाठवून अनुकंपा नियुक्तीचे प्रकरण लावून धरले होते. मात्र गेल्या दहा वर्षापासून या नियुक्तीला यश आलेले नव्हते. या प्रकारामुळे काही अनुकंपा उमेदवारांचे भरतीचे वय देखिल निघून गेले. परंतु मागील दोन वर्षापूर्वी महापालिकेला यश आले. शासनाने अनुकंपा भरतीला मंजुरी दिल्याने अनुकंपा भरतीचा मार्ग मोकळा झाला होता. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती नंतर आस्थापना खर्चात वाढ होणार असल्याने स्थायी समितीकडे अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवल्या नंतर स्थायी समितीने मंजुरी देखील दिली होती. मात्र प्रशासनाने बिंदु नामावली, आस्थापना खर्च आदी बाबी समोर करुन या नियुक्त्या थांबवल्या. अद्यापही या नियुक्त्या झालेल्या नाहीत.

काहींचे वय निघुन गेले

88 उमेदवारांपैकी 66 अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार होती. तर काही उमेदवारांचे वय वाढल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या उमेदवारांनी गेल्या अनेक वर्षा आधीच अनुकंपा नियुक्ती बाबतचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. या नियुक्तीस महापालिकेने विलंब केल्याने पात्र लाभार्थ्यांचे वय वाढण्यास उमेदवारा ऐवजी महापालिकेला जबाबदार मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...