आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:धाबेकर कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडकी येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समान संधी केंद्राच्या डॉ. संगीता लोहकपुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी युनिक ॲकॅडमी पुणेचे संचालक प्रा. खराटे, प्रा. खंडारे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. अंकुश माकोडे हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक होते. याप्रसंगी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य डॉ . निता तिवारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक डॉ .संगीता लोहकपुरे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

शाळाबाह्य एनकवरेज एज्युकेशन सेंटरला भेट ः श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे अकोट फैल येथील एनकव्हरेज एज्युकेशन फाउंडेशन या शाळाबाह्य मुलांच्या शैक्षणिक केंद्राला डॉ. संगीता लोहकपुरे माजी प्राचार्य व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी भेट दिली .

संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी विद्यार्थ्यांची हितगूज केले. वय वर्षे ४ ते १२ वर्षापर्यंतचे विद्यार्थी इथे संध्याकाळी ४ ते ६ वाजतादरम्यान शिक्षण घेतात. शिक्षणा व्यतिरिक्त त्यांचे सर्व कलाकौशल्य, नृत्य, नाट्य , कलाकृती इतर उपक्रम सुद्धा राबविण्यात येतात. थोर नेत्यांच्या जयंतीनिमित्त विविध वेषभुषा, नाट्य सादरीकरण, विज्ञान मॉडेल यासारखे सर्व शाळा उपक्रम राबविल्या जातात. या प्रसंगी डॉ. संगीता लोहकपुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांना आरोग्य, खेळ, व्यायाम, आहार, परिश्रम, चांगल्या सवयी, आनंद छंद या सर्वांवर मार्गदर्शन करून प्राणायाम शिकविले व या विद्यार्थ्यांसाठी व स्टाफसाठी विभागातर्फे भोजनाचे आयोजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...