आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:अन्वीत दलित वस्तीचा रस्ता कॅनॉलवर बांधल्याची तक्रार; सामाजिक कार्यकर्ते  राजूभाऊ सिद्धार्थ खांडेकर यांनी केली

बोरगाव मंजूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अन्वी ग्रामपंचायतअंतर्गत दलित वस्तीचा रस्ता कॅनलच्या जागेवर बांधल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ सिद्धार्थ खांडेकर यांनी केली. हा रस्ता बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. सिंचन कॅनलच्या जागेवर रस्ता बांधण्यासाठी परवानगी दिल्याने संबंधित विभागाचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दलित वस्ती निधी लाटण्यासाठी गावात खोट्या दलित वस्ती, चुकीचे नकाशे तयार करून शासनासह जि. प.ची दिशाभूल केल्याचे तक्रार कर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीने दलित वस्तीसाठी चुकीच्या मार्गाने निधी पंचायत समितीमधून वर्ग करण्याची तयारी केली आहे, ही बाब तक्रारकर्ते, सामाजिक कार्यकर्ते राजू सिद्धार्थ खांडेकर यांच्या लक्षात आली. त्यांनी फेब्रुवारीत पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून याबाबत चौकशी करण्यासाठी निवेदन दिले. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत दलित विकास निधी अन्वी ग्रामपंचायतीला न देण्याची मागणी केली.

तरीही कामासाठी निधी दिला. यातही कॅनलच्या जागेवर रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे काम थांबववे, कामाची चौकशी करवी, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. याबाबत जिल्हाप्रशासनाकडे तक्रार केली. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी कटारिया, गटविकास अधिकारी राहुल शेळके यांच्या चौकशीकडे, निर्णयाकडे लक्ष लागले आहे.