आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करा; घाटावर कठडे बांधा

अकाेला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण मासातील कावड-पालखी उत्सवाच्या अनुषंगाने शिवभक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या मागण्यांबाबत निवेदन देऊन चर्चा केली. जल आणण्याठी शिवभक्त जात असलेल्या गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याचे संपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांची पूर्तता उत्सवापूर्वी करण्याची मागणी करण्यात आली.

अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराच्या कावड-पालखी सोहळ्याला ७६ वर्षांची परंपरा आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील जल घेऊन शिवभक्त राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. गत दाेन वर्षे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता उत्सवावर मर्यादा आली हाेती. मात्र यंदा निर्बंध हटल्याने शिवभक्त हा उत्सव उत्साहात साजरा करणार आहेत. श्रावणातील चाैथ्या साेमवारी शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रातून जल अकाेल्यात आणणात. हजारे शिवभक्त शेकडाे भरण्यांची कावड घेऊन पायी प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शिवभक्तांचे प्रचंड हाल हाेतात. काही जण जखमीही हाेतात. त्यामुळे उत्सवापूर्वी रस्त्यासह अन्य समस्या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी शिवभक्तांनी केली.

निवेदन देताना राजेश भारती, अॅड. पप्पू मोरवाल, गोपाल नागपुरे, सागर भारुका, मंगेश गाडगे, अरुण डावरे, करण गहिलोत, आशीष पवार, मनीष रुल्हे, संकेत उन्हाळे, नमन आंबेकर , ललित देवगडे, विशाल लिखार आदी उपस्थित हाेते.

अकाेला-अकाेट रस्त्याचे काम रखडले ः अकाेला ते अकाेट यामार्गावरील गांधी ग्रामपर्यंतचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. रस्ता कांॅक्रिटीकरणासाठीची माती, बांधकाम साहित्य अनेक ठिकाणी विखुरलेली असून, वाहन घसरते. परिणामी अपघात व प्रसंगी जीवित हानीही हाेण्याची भीती आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने उत्सवापूर्वी पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.

लाेखंडी बॅरीकेट्स हवेत ः गांधी ग्राम येथे घाट बांधण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी लाेखंडी बॅरीकेट्स नाहीत. सध्या पावसाळा सुरू असून, पूरस्थिती केव्हाही निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे दुर्घटना घडू शकते. यासाठी तातडीने उपाय याेजना करण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...