आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उत्तर झोनमध्ये नळ मीटर रीडिंग पूर्ण; पूर्व झोनमध्ये देयके वाटप तर पश्चिममध्ये मीटर रीडिंग सुरू

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोलाशहराच्या उत्तर झोन मध्ये नळ मीटर रिडींगचे काम पूर्ण झाले आहे. या भागात आता देयके वितरणाचे काम सुरु करणार असून पश्चिम झोन मध्ये मिटर रिडींगचे काम सुरु करण्यात आले आहे.पूर्वी नागरिकांना मालमत्ता कराच्या देयकातच पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र नळांना मीटर लावण्याची मोहिम सुरु झाल्या नंतर मनपा पाणी पुरवठा विभागाने स्वतंत्रपणे पाणीपट्टी देयक वाटपाचे काम हाती घेतले.

मीटर रिडींग आणि देयके वितरीत करण्याचे काम कंत्राटीने दिले होते. मात्र संबंधित कंत्राटदाराला त्याचे देयक न दिल्याने संबंधित कंत्राटदाराने काम बंद केले. हे काम बंद झाल्या नंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागली. निविदा प्रक्रिया राबवल्या नंतर स्थायी समितीने या निविदांना मंजुरी दिली. परंतु शिवसेनेने स्थायी समितीने घेतलेल्या या सभेवर आक्षेप नोंदवला. शासनाने योची दखल घेत, स्थायी समितीने मंजुर केलेले सर्व ठराव रद्द केले. यात मिटर रिडींग आणि पाणीपट्टी देयक वाटपाचा समावेश होता. त्यामुळे या ठरावाची अंमलबजावणी करता आली नाही.

परिणामी महापालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली. या सर्व प्रकारामुळे जवळपास आठ ते दहा महिने पाणीपट्टी देयके वाटपाचे काम बंद होते. यामुळे महापालिकेला लाखो रुपयाच्या महसुलापासून वंचित राहावे लागले. दरम्यान नविन निविदेत प्रशासनाने केवळ कंत्राटदाराकडून तांत्रिक मदत घेतली. मिटर रिडींग आणि पाणीपट्टी देयक वितरणाचे काम मनपाने स्वत:कडे घेतले. परिणामी झोन निहाय हे काम सुरु करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...