आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या पाणी येणार की नाही?:2 जलकुंभांवर स्काडा ऑटोमेशन प्रणालीचे काम पूर्ण; पण जलकुंभाच्या व्हॉल्वची समस्या

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्थानकासमोरील 2 जलकुंभांवर स्काडा ऑटोमेशन प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र जलकुंभाच्या व्हॉल्वची समस्या उदभवल्याने या दोन्ही जलकुंभावरुन 23 जून रोजी पाणी पुरवठा होईल की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा सबलीकरणाची विविध कामे सुरु आहेत. स्कॉडा ऑटोमेशन पद्धतीमुळे पाण्याची गुणवत्ता व संयंत्रणाचे विविध प्रमाणके ऑनलाईन पाहता येणार आहे व आवश्यकतेप्रमाणे कंट्रोल करता येणार आहे. त्यामुळे प्रथम नव्याने बांधलेल्या जलकुंभावर ही प्रणाली बसवण्याचे काम टप्प्या-टप्प्याने केले जात आहे.

अखेर काम पूर्ण

रेल्वे स्थानकासमोरील दोन जलकुंभावर ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. त्यामुळे या दोन्ही जलकुंभावरील पाणी पुरवठा 22 जूनपर्यंत बंद करण्यात आला होता. तसेच 23 जुनपासून या जलकुंभातून पाणी पुरवठा होईल, अशी माहिती विभागाने दिली होती. मात्र, स्काडा ऑटोमेशनचे काम पूर्ण झाले असले तरी जलकुंभाचा व्हॉल्वची समस्या उदभवली आहे. हे काम त्वरित झाल्यास 23 जुन रोजी काही भागाला पाणी पुरवठा होईल. मात्र हे काम पूर्ण होणार की नाही? याबाबत अधिकारी निश्चित माहिती देवू शकत नाही. त्यामुळेच काम झाल्यास पाणीपुरवठा होणार आहे.

या भागात उद्या पुरवठा

जलकुंभाच्या व्हॉल्वचे काम पूर्ण झाल्यास 23 जुन रोजी सोळाशे प्लॉट, मोचीपूरा, अण्णाभाऊ सठे नगर, भिम चौक, मस्तान चौक, साधना चौक, संपूर्ण भोईपूरा, पुरपिडीत कॉलनी, कुरेशी कॉलनी, अकोट रोड, मुकुंदवाडी, राजीव नगर, हाजी नगर, अकबर प्लॉट, गायकवाड मोहल्ला या भागाला पाणी पुरवठा होईल. काम पूर्ण न झाल्यास 24 जुन रोजी पाणी पुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...