आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षण:स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे अटल लॅब व्ह्यू वर्कशॉप बुट कॅम्पचा समारोप

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे अटलबुट कॅम्प पूर्ण झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताराज विद्यासागर, स्वप्निल मेहेसेर,कपिल बजाज यांची उपस्थिती होती.शालेय प्रशासकीय अधिकारी राजेश कुमार कड यांनी विद्यार्थ्यांना एटीएम अटळ टिकंरिंग लॅबबद्दल संबोधित केले. अशा वैज्ञानिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. कोडींग रोबोट व बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे महत्व व उपयोग सांगितले. या कॅम्पमध्ये घनश्याम पुरहाड यांनी ज्या बेसिक गोष्टी शिकवल्या त्यावरून मुलांनी समाजातील समस्या सोडवण्याच्या हेतूने प्रोजेक्ट केले.

यात सात गटांनी सात मॉडेल्स तयार केले. मुख्य पाहुणे विद्यासागर यांनी सात गटांचे परीक्षण करून त्यांच्या मॉडेल्समध्ये नाविन्यता काय करता येईल. याबद्दल मार्गदर्शन केले. व परीक्षकांनी परीक्षण करून दोन गटांना विजयी घोषित केले. मान्यवरांच्या हस्ते त्या विजयी गटांला चषक दिले. पहिला क्रमांक एपीजे कलाम गट, द्वितीय क्रमांक हॉकिंग गट यांनी पटकावला. सूत्रसंचालन पवन देशमुख यांनी केले आभार भानुदास तिव्हाळे यांनी केले. या कार्यक्रमात निवडलेले ४५ विद्यार्थी व ५० पालकांचा सहभाग होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर, राजेश कुमार कड, उपमुख्याध्यापिका कोमल लहरिया अनघा लोथे, अटळ इन्चार्ज भानुदास तिव्हाळे, पवन देशमुख, संगीत विभाग प्रमुख राहुल वानखडे, आर्ट विभाग प्रमुख रवींद्र काळपांडे यांच्यासह अनेकाचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...