आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:लाखाेंचा ऐवज असलेली पिशवी परत‎ करणाऱ्या जावेद शेख यांचा सत्कार‎

वाशीम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते‎ पाटणी चौक मार्गावर कांदे विक्री‎ करणाऱ्या शेख जाहेद उर्फ शेख‎ जावेद पैलवान यांनी आठ लाख रुपये‎ किंमतीचे सोने व रोख रक्कम‎ असलेली पिशवी पोलिसांच्या‎ स्वाधीन केल्याने मूळ मालकाला‎ मिळाली. याबद्दल त्यांचा तरुण क्रांती‎ मंच व भारतीय जैन संघटनेच्या वतीने‎ जिल्हाध्यक्ष निलेश सोमानी व‎ सामाजिक कार्यकर्ते संजीव भांदुर्गे‎ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‎ शेख जावेद पैलवान यांनी‎ दुकानासमोर स्वच्छता करताना सदर‎ पिशवी आढळल्याचे सांगितले.‎

दिवसभर वाट पाहिल्यानंतर कोणीही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चौकशीसाठी न आल्याने त्यांनी ती‎ पिशवी पोलिसांच्या स्वाधीन केली‎ होती. शेख जावेद पहेलवान यांचे पुत्र‎ शेख कैफ यांनी वडीलाचा आम्हाला‎ अभिमान असल्याचे सांगितले.‎ संबंधित मालकाने शेख यांना एक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लाख रुपये, तर जिल्हा पोलिस‎ अधीक्षक बच्चन सिंह यांनी २१ हजार‎ रुपये रक्कम बक्षीस स्वरूपात देण्याचे‎ सांगितले होते. मात्र वडिलांनी ही सर्व‎ रक्कम नाकारल्याचे त्यांच्या मुलाने‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...