आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅस सिलींडरचे वाढलेले दर, महागाईसह अन्य प्रश्नांवर काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. मदनलाल धिंग्रा चाैकात (मध्यवर्ती बस स्थानक) काँग्रेसने केंद्रातील भाजप नेतृत्वातील सरकारच्या विराेधात निदर्शने केली.तसेच महिलांना शेणाच्या गाैऱ्यांचे वितरण करीत अनाेख्या पद्धतीने निषेध केला.
होळी आधीच देशभरातील जनतेचा रंगाचा बेरंग झाला आहे. सकाळीच घरगुती आणि कमर्शियल सिलिंडरचे दर महागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयाने महागले आहेत. तर कमर्शियल गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला आहे. महागाईने आधीच सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेले असतानाच या दरवाढीमुळे सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. गतगेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलाबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण 5 वेळा बदल झाला आहे. इंधनाचेही दर वाढले आहे. दरम्यान गॅसदरवाढीसह अन्य मुद्दांवर महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलन महिलांसह पुरुष पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले.
असे केले आंदोलन
असाही निषेध
आदाेलनात प्रतिकात्मक हाेळी तयार करण्यात आली. यावर महिला अत्याचार, बेराेजगारी, भ्रष्टचार, महागाई, इंधन दरवाढ आदींचे फलक लावण्यात आले. यामाध्यमातून देशातून या समस्यांवर महिला काँग्रेसकडून प्रकाशझाेत टाकत केंद्र सरकारचा निषेध नाेंदविण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.