आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महाेत्सवानिमित्त पदयात्रा:काँग्रेसकडून वाडेगाव येथे पदयात्रा

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त पदयात्रा काढण्यात येत असून, वाडेगाव परिसरातही शनिवारी पदयात्रेचे आयाेजन केले हाेते. कान्हेरी ते वाडेगावपर्यंत तिरंगा ध्वज हातात घेऊन काँग्रेसकडून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप डॉ. नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.

पदयात्रा १५ किमीपर्यंत काढण्यात आली. भव्य दिव्य तिरंगा ध्वज व शहिदांच्या प्रतिकृती, आजादी गौरव यात्रेचा रथ घेऊन काँग्रेसने यात्रा काढली. पदयात्रेत जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, पदाधिकारी प्रकाश तायडे, महेश गणगणे, जिल्हासंघटक अविनाश देशमुख, जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, माजी सदस्य डॉ. हिम्मतराव घाटोळ, प्रमोद डोंगरे, अतुल अमानकर, प्रा. डॉ. जगदीश चिंचोळकर, संजय पेटकर, शुभम पाचपोर, सुनील वाढोकार, विशाल लोखंडे, सचिन धनोकार, रमेश चिंचोळकर, गुलाब लोखंडे, पांडुरंग कातखेडे, मुरलीधर धनोकर, विष्णू मसने, ज्ञानदेव जढाळ, महिला ग्रामीणच्या अध्यक्ष पूजा काळे, जया देशमुख, पुष्पा देशमुख, मंदा मानकर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पदयात्रेनंतर सचिन धनोकार, दत्तात्रय लोखंडे, शुभम पाचपोर, अनिल धनोकार, विशाल लोखंडे, बबलू प्रधान, सुनील वाढोकार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

बातम्या आणखी आहेत...