आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिपीसी निवडणुकीत 10 पैकी 5 जागा घेत 'वंचित'ची बाजी:काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना प्रत्येकी एक, भाजप 2 जागांवर विजयी

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा नियोजन समितीवर (डिपीसी) ग्रामीण मतदारसंघातून अर्थात जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून देण्यासाठी मंगळवारी मतमाेजणीची प्रक्रिया पार पडली. 10 पैकी 5 जागांवर विजयी मिळत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला. मात्र संख्या लक्षात घेता वंचितला भाजपची साथ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचे दाेन तर महािवकास आघाडीतील शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषदेतून (ग्रामीण मतदारसंघ) निवडून देण्यासाठी 29 ऑगस्ट राेजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लाेकशाही सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती.

30 ऑगस्ट राेजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. 53 सदस्य संख्या असलेल्या जि. प. मध्ये वंचितचे 25 आणि महािवकास आघाडीचे 23 व भाजपचे पाच सदस्य आहेत. महािवकास आघाडीतील शिवसेनेचे 12, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रत्येकी चार, अपक्ष दाेन, प्रहार जनशक्ति पक्षाचा एक सदस्य आहे. 53 पैकी 52 जणांनी मतदान केले हाेते.

असे आहे जय-पराजयाचे चित्र

अनुसूचित जाती (महिला) प्रवार्गातून वंचितच्या निती गवई, शिवसेनेच्या वर्षा वजिरे विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसृच्या रंजना विल्हेकर यांचा पराभव झाला. अनुसूचित जाती प्रवर्गातून वंचितचे आकाश सिरसाट यांनी शिवसेनेच्या प्रशांत अढाऊ यांचा पराभव केला. सर्वसाधरण (महिला) प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या किरण अवताडे, वंचितच्या मिना बावणे व प्रमाेदिनी काेल्हे विजयी झाल्या. शिवसेनेच्या गायात्री कांबे आणि अनुसया राऊत यांचा पराभव झाला.

सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपचे प्रकाश अतकड, वंचितचे शंकरराव इंगळे व काँग्रेसचे चंद्रशेखर चिंचाेळकर विजयी झाले. शिवसेनेचे संजय अढाऊ, अपक्ष गजानन पुंडकर यांचा पराभव झाला. अनुसूचित जमाती प्रवर्गातून भाजपचे रायसिंग राठाेड अविराेध निवडून आले.

पुन्हा नवे समिकरण

जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षासह दोन सभापती पदे वंचितकडे आहेत. मात्र, ऑक्टाेबरमध्ये झालेल्या दाेन सभापती पदांच्या निवडणुकीत महािवकास आघाडीने भाजपच्या मदतीने विजय मिळवला हाेता. मात्र, डिपीसीच्या िनवडणुकीत भाजप-वंचितने एकमेकांना साथ दिल्याची चर्चा रंगली. त्यामुळे आगामी अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतीच्या निवडणुकीत पुन्हा नवे समिकरण तर जुळवून येणार नाही, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...