आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांना धान्य द्या, काँग्रेसचे राेटी बचाओ आंदोलन:'अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर’चे परिपत्रक मागे घ्या; गिव्ह इटअप याेजनेला विराेध

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेला हक्काचे धान्य मिळालेच पाहीजे, असा फलक घेत काँग्रेसने मंगळवारी राेटी बचाओ जनआंदोलन पुकारत माेर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या माेर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नसलेल्या सधन नोकरदार, व्यवसायी व शेतकरी लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर आता वातावरण तापले आहे.

जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिधापत्रिकाच्या आधार सीडींगमुळे योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी याेग्य लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आधारसीडींमुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित व मयत इत्यादी लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे गरजू लाभार्थी इष्टांक मर्यादेमुळे योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत, अशा लोकांना योजनेचा लाभ मिळेल, असे प्रशासनाने म्हणणे आहे. दरम्यान या विराेधात काँग्रेसने माेर्चा काढला.

काय आहे निवेदनात

  1. जिल्हा प्रशासनाने ३१ जानेवारी राेजी जारी केलेल्या परिपत्रात त्रृटी असल्याचे काँग्रेसने निवेदनात नमूद केले. परिपत्रकातील मुद्दानुसार ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न पेक्षा अधिक उत्पन्न असल्यास लाभार्थ्यांना बाहेर पडणे नमूद आहे. मात्र शासनाच्या २०१३च्या निर्णयामध्ये ग्रामीण भागामध्ये ४४ हजार रुपये व शहरी भागामध्ये ५९ हजार रुपच्यावर उत्पन्न घेणाऱ्याला वगळावे असे नमूद आहे. मात्र आपण आजही ६० रुपयांची आर्थिक मर्यादा लावलेली आहे.
  2. शासन निर्णयातील उत्पन्न मर्यादा ६० टक्के वाढ करून आर्थिक मर्यादा शहरी भागासाठी १ लाख व ग्रामीण भागासाठी ७५ हजार करणे अपेक्षित आहे. मात्र याचा विचार न करता ही मर्यादा ६० हजार ठेवलेली आहे. हे चुकीची व अन्याय कारक आहे.

...तर येईल उपासमारीची वेळ

  • चार चाकी वाहन असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण सरसकट वगळत असल्याचे परित्रकार नमूद आहे. ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुण उदरनिर्वाह करता चार चाकी वाहनांचा वापर करतात. त्यांनाही याेजनेतून वगळण्यात आले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पाच एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या लाभार्थ्यांना आपण सधन म्हटलेले आहे. हे शंभर टक्के चूक आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना अन्नधान्याची गरज आहे.
  • सर्व पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ घेऊ नये असे नमूद केले आहे. वास्तविक एसटी महामंडळ, विद्युत महामंडळ, बियाणे महामंडळ, अशा निमशासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पेन्शन मिळते, यांना या योजनेतून वगळल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...