आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना दिलासा द्या:महागाईविरोधात काँग्रेसकडून निषेध; केंद्र सरकारचा निषेध

बुलढाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाळ मृदंगांच्या गजरात केला केंद्र सरकारचा निषेध
निवडणुका संपताच भाजपने पुन्हा दरवाढ करून सर्वसामान्य जनतेस लुटण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने आज १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता येथील जयस्तंभ चौकात टाळ मृदंगाचा गरज करत महागाईचा निषेध केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील तायडे व शहर अध्यक्ष दत्ता काकस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आज शुक्रवारी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बाळू भाकरे, जाकिर कुरेशी, शेख मुजाहिर, अमिन टेलर, पल्लू गाडेकर, रोहित गवई, कांता चव्हाण, शेषराव पाटील, तेजराव सावळे, बंडू काळवाघे व नीलेश हरकळ सहभागी झाले होते.

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवकचे ‘एप्रिल फूल’ आंदोलन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुशांत तांगडे यांच्या नेतृत्वात मोदींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फूल दिवस मानून शुक्रवार रोजी एप्रिल फूल आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकार जनतेला मुर्ख बनवत असल्याने मेहबूब शेख, रविकांत यांच्या आदेशाने व पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनामध्ये युवा राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे मोदींच्या आश्वासनांचा केक कापण्यात आला. तसेच पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी प्रमोद पाटील, रवींद्र तोडकर, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, शिवाजी शिराळे, सुनील सुरडकर, सुभाष देव्हडे, प्रशांत डोंगरदिवे, मलिक सौदागर, प्रमोद चिंचोले, आदींसहित युवा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

महागाई विरोधात काँग्रेसची खामगावात निदर्शने
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आवाहनानुसार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार खामगावात आज शुक्रवार १ एप्रिल रोजी माजी आमदार सानंदा यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या महागाई विरोधात आंदोलन केले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, विजय काटोले, सरस्वतीताई खासने, रोहित राजपूत, किशोरआप्पा भोसले, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, सुरेश वनारे, सुरेशसिंह तोमर, इनायतउल्ला खॉं, विठ्ठल सोनटक्के, बबलू पठाण, स्वप्नील ठाकरे, गणेश ताठे, चैतन्य पाटील, प्रीतम माळवंदे, विलाससिंग इंगळे, तुषार चंदेल, अनंता धामोळे, जयराम मुंडाले, कैलास साबे, मनोज वानखडे, शांताराम करांगळे, प्रकाश नरवाडे, मो.नफीज,एजाज देशमुख, गोपाल उज्जैनकार, अनंता माळी, जसवंतसिंग शिख सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...